शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणी

By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:41+5:302015-02-14T23:51:41+5:30

कन्नड : शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

Shiv Jayanti Festival Committee Executive | शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणी

शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणी

googlenewsNext
्नड : शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष विशाल सिरसे पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश शिरसे, उपाध्यक्ष विलास जाधव, मंगेश मावस, सरचिटणीस अतुल बावस्कर, कोषाध्यक्ष कार्तिक जाधव, चिटणीस शुभम पवार, विशाल सागर, सदस्य नागेश्वर त्रिभुवन, संभाजी खेडकर, सुरेश जंगले, अविनाश काळे, भगवान गोंडे, अक्षय बनकर, आकाश मोरे, अनिल थोरात.
बैठकीस मनोज देशमुख, स्वप्नील जहागीरदार, रवी राठोड, अनिल वायडे, नगरसेवक राजू पवार, भगवान शिंदे, प्रदीप बोडखे, दीपक दाभाडे, संतोष मैराळ पाटील, पोपट निकम, नितीन आल्हाड, नगरसेवक शेख सलीम, कैलास जाधव, पापाखान, बंडू थेटे, संदीप जाईबहार, नितीन आल्हाड, अमोल पवार आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न सुटला
खंडाळा : दुष्काळग्रस्त परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील व्यापारी बंधूंनी स्वर्गवासी आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला बोअरवेल व विद्युत पंप अर्पण केल्याने एक हजार विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.
येथील जि.प. हायस्कूल व प्राथमिक शाळेत भीषण पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन व्यापारी प्रकाश कासलीवाल, महावीर कासलीवाल व संतोष कासलीवाल यांनी आपल्या स्वर्गवासी वडील धन्नालालजी कासलीवाल व आई मोसंबाबाई कासलीवाल यांच्या स्मरणार्थ स्वयंस्फूर्तीने जि.प. शाळेस बोअरवेल व विद्युत पंप बसवून दिल्याने तूर्तास एक हजार विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले.
परिसरातील विद्यासागर कन्या प्रशालेतही याचप्रमाणे बोअरवेल, पाण्याची टाकी, विद्युत पंप बसवून या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जोपासत एक आदर्श निर्माण केला. यावेळी जि.प. सदस्य सूरजनाना पवार, सरपंच बाळासाहेब शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मगर, मुख्याध्यापक ई.बी. गवळी, श्रेयस कासलीवाल, राजेंद्र नवले, अशोक दारुंटे, संदीप तुबारे आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Jayanti Festival Committee Executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.