Eknath Shinde Ayodhya Visit Live: राम मंदिराला जेवढे सागवान लागेल, महाराष्ट्र देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 10:35 AM2023-04-09T10:35:32+5:302023-04-09T14:23:38+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार, मंत्र्यांसह नियोजित   अयोध्या  दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनौमध्ये दाखल झाले.  यावेळी त्यांचे लखनाै विमानतळावर ढाेल-ताशांच्या ...

Shiv sena CM eknath shinde, Devendra Fadanvis ayodhya visit live updates in marathi | Eknath Shinde Ayodhya Visit Live: राम मंदिराला जेवढे सागवान लागेल, महाराष्ट्र देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde Ayodhya Visit Live: राम मंदिराला जेवढे सागवान लागेल, महाराष्ट्र देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार, मंत्र्यांसह नियोजित  अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनौमध्ये दाखल झाले.  यावेळी त्यांचे लखनाै विमानतळावर ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना माेठा हार आणि गदा देण्यात आली. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येला उपस्थित राहणार आहेत. 

01:31 PM

नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे सांगा. - एकनाथ शिंदे

हनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे सांगा. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे चुप बसलेले. आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही. आम्ही त्यांचे रक्षण करणार. महाराष्ट्रात आता प्रभू रामांच्या आशिर्वादाने बनलेले सरकार काम करणार आहे, असा मी विश्वास देतो. - एकनाथ शिंदे.

01:21 PM

राम मंदिराला जेवढे सागवान लागेल, महाराष्ट्र देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

लखनऊ ते अयोध्यात पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. तिथे ११४ फुटी हणुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याचे मी आभार मानत आहे. बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराचे निर्माण व्हावे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. - एकनाथ शिंदे. 

01:16 PM

रवी राणा इथली माती घेऊन अमरावतीला जाणार आहेत - एकनाथ शिंदे

लखनऊ ते अयोध्यात पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. तिथे ११४ फुटी हणुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याचे मी आभार मानत आहे. बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराचे निर्माण व्हावे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. - एकनाथ शिंदे. 

12:46 PM

राम अयोध्येत जन्मल्याचे जे पुरावे मागत होते, ते घरी बसलेत - देवेंद्र फडणवीस 

राम अयोध्येत जन्मल्याचे जे पुरावे मागत होते, ते घरी बसलेत आणि रामाचे भक्त सत्ते आलेत. मला दिल्लीला महत्वाच्या कामासाठी जायचे आहे. ब्रिजभूषण आणि मुख्यमंत्र्यांचा मी निरोप घेतो. - देवेंद्र फडणवीस 

12:12 PM

शिंदे, फडणवीसांसह मंत्र्यांकडून रामलल्लाची महाआरती -

शिंदे, फडणवीसांसह मंत्र्यांकडून रामलल्लाची महाआरती सुरु.



 

12:46 PM

शिंदे, फडणवीस हनुमान गढी येथे पोहोचले.

रामलल्लाची आरती झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राम मंदिराच्या कामाची पाहणी केली. आता दीड किमीवर असलेल्या हनुमान गढीजवळ पोहोचले आहेत. 

12:39 PM

मंदिर निर्माणासाठी खारीचा वाटा उचलणार; आता लाकूड सुपूर्द केले - एकनाथ शिंदे

राम मंदिर निर्माणासाठी आम्ही नक्कीच खारीचा वाटा उचलणार, आम्ही निर्माणासाठी लाकूड दिले आहे. - शिंदे.

12:35 PM

शिंदे, फडणवीस यांच्याकडून राम मंदिराच्या निर्माण कामाची पाहणी. 

राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण होतेय. करोडो भारतीयांची ही भावना आहे. याचा आनंद आहे. कार सेवक असतानाची अयोध्या मला आठवतेय. माझ्या डोळ्यासमोरून तरळतेय. आपण हयात असताना हे व्हाव, त्यापेक्षा खूप लवकर हे होतेय- देवेंद्र फडणवीस

12:05 PM

राज्यातील बळीराजावरील अरिष्ट दूर होवो हीच आमची इथे मागमी आहे. - एकनाथ शिंदे.

रामराज्य अपेक्षित आहे. त्याची संकल्पना या ठिकाणाहून सुरु होईल. राज्यातील बळीराजावरील अरिष्ट दूर होवो हीच आमची इथे मागमी आहे. - एकनाथ शिंदे.

11:54 AM

आम्ही शिंदेंना आग्रह केला, सगळे एकत्र जाऊ. मागच्यावेळी विमानतळावरून मागे पाठविलेले - देसाई

गेल्या वेळेला आम्हाला विमानळावरून माघारी पाठविण्यात आले होते. आमचे बोर्डिंग पास काढले होते. विमानात बसण्यापूर्वी तुम्ही येऊ नका असे सांगितले गेले. तेव्हापासून दौरा राहिला होता. आम्ही शिंदेंना आग्रह केला, सगळे एकत्र जाऊ. त्यामुळे आम्ही आलो आहोत. - शंभुराज देसाई

11:46 AM

मागच्या दौऱ्यावेळी आम्हाला बोलावले नव्हते - गुलाबराव पाटील

मागच्या दौऱ्यावेळी आम्हाला बोलावले नव्हते, यावेळी बोलावले म्हणून आलो आहोत. - गुलाबराव पाटील

11:33 AM

महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांसाठी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता - सामंत

हिंदुत्वाचा जो विचार गेले अडीच वर्ष बाजुला राहिला होता तो पुन्हा एकदा प्रस्तापित केला आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इथे आले आहेत. उत्तर प्रदेशची जनता जी महाराष्ट्रामध्ये राहते, त्यांना सुख- सोई आणि काय ताकद दिली पाहिजे याबाबत चर्चा करण्यासाठी आज योगी आदित्यनाथ  यांची भेट होण्याची शक्यता आहे - उदय सामंत 

11:31 AM

वायफळ बडबड करण्याची काही लोकांची सवय आहे -मंत्री दादा भुसे 

आयोध्येमध्ये राम मंदिर बांधुव दाखवणार. देशातील काश्मिर मध्ये ३७० कलम हटवणार. आमच्या ह्या शुभ दिवशी काही लोकांचं नाव न घेतलेलं बरं आहे. वायफळ बडबड करण्याची काही लोकांची सवय आहे. जनता वायफळ बडबड करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही, असे दादा भुसे म्हणाले.

11:19 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती. रामजन्मभूमी असल्याने उत्साह साहजिक आहे, असे फडणवीस म्हणाले. 

11:06 AM

राम मंदिराजवळ मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरले, थोड्याच वेळात रामलल्लाचे दर्शन घेणार

राम मंदिराजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर उतरले, थोड्याच वेळात रामलल्लाचे दर्शन घेणार



 

11:26 AM

राजकारण करण्यासाठी अयोध्येत आलेलो नाही. - श्रीकांत शिंदे

राजकारण करण्यासाठी अयोध्येत आलेलो नाही. गेल्या अडीज वर्षांत कोण रामराज्य करत होता? हनुमान चालिसा वाचण्यासाठी जाणाऱ्यांवर कारवाई केली. नवनीत राणांना आत टाकले. दाऊदशी संबंधीत मंत्र्याचे मंत्रीपद काढून घेऊ शकला नाही. विरोधात बोलणाऱ्याचे घर तोडला - श्रीकांत शिंदे. 

11:24 AM

वाल्मिकीचे रामायण या लोकांनी वाचायला हवे. बाळासाहेबांचे वचन कोणी मोडले? श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर टीका

वाल्मिकीचे रामायण या लोकांनी वाचायला हवे. बाळासाहेबांचे वचन कोणी मोडले? यांनी काय केले आपल्या भावाला बाहेर काढले, कोणाला एकत्र ठेवले नाही. आम्हाला म्हणतायत रावण राज्य आहे, कोणी काय बोलले त्याला तुरुंगात टाकले, ते रामराज्य होते का? - श्रीकांत शिंदे

10:49 AM

आम्ही इतक्यांदा अयोध्येला गेलो, भाजपा कधी येत नव्हती, बाबरीवेळी तर पळाले होते - संजय राऊत

आपणही प्रभू रामाला मानतो. आम्हीही अनेकवेळा अयोध्येला गेलो आहोत. पण भाजप कधीच आमच्या पक्षासोबत आला नाही. बाबरीची घटना घडली तेव्हा ते पळून गेले... पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत पण या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राज्याचे सरकार अयोध्येला गेले. भगवान राम त्यांना आशीर्वाद देतील का?... ते आमची नक्कल करत आहेत. ओरिजिनल आणि डुप्लिकेट कोण हे जनतेला माहीत आहे: संजय राऊत, उद्धव ठाकरे गट


10:46 AM

रामलल्लाचे दर्शन, आरती होईल, लक्ष्मण किल्ल्यावर देखील जाणार आहोत - एकनाथ शिंदे.



 

10:45 AM

माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. मुख्यमंत्री शिंदेंमुळे योग जुळून आला. - देवेंद्र फडणवीस.



 

10:42 AM

जायचे होते दिल्लीला, फडणवीस पोहोचले अयोध्येला; अचानक ठरले, शिंदेंनीच लखनऊमध्ये सांगितले

देवेंद्र फडणवीसही अयोध्येला निघाल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
जायचे होते दिल्लीला, फडणवीस पोहोचले अयोध्येला; अचानक ठरले, शिंदेंनीच लखनऊमध्ये सांगितले

 

10:41 AM

एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून लागले होर्डिंग...



 

Web Title: Shiv sena CM eknath shinde, Devendra Fadanvis ayodhya visit live updates in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.