संसदेच्या प्रांगणात आले शिवसेना नेते आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:01 AM2018-08-10T04:01:32+5:302018-08-10T04:01:44+5:30
शिवसेना नेते आदित्य ठाकरे गुरुवारी संसदेच्या प्रांगणात आले.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : शिवसेना नेते आदित्य ठाकरे गुरुवारी संसदेच्या प्रांगणात आले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर व हर्षवर्धन यांची भेट घेतली.
संसदेजवळ सेनेच्या खासदारांनी आदित्य यांचे स्वागत केले. त्यानंतर ते संसदेतल्या शिवसेना कार्यालयात गेले. जावडेकर यांच्या भेटीत आदित्य ठाकरेंनी माँटेसरी व प्री प्रायमरी शाळा पालकांकडून अॅडव्हान्स देणग्या घेतात, त्यांच्या आर्थिक दर्जावर मुलांचा प्रवेश ठरतो, या सर्वांसाठी आरटीआय लागू करण्याची मागणी केली. देशभर प्लॅस्टिक बंदी करा, अशी मागणी पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. गडकरींकडे त्यांनी महामार्गांवर रेन हार्वेस्टिंग आणि सौरऊर्जा निर्मितीची मागणी केली.