पंतप्रधानांनी घेतली कोरोनाची लस, संजय राऊतांनी लगावला टोला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 11:01 AM2021-03-01T11:01:40+5:302021-03-01T11:04:11+5:30

Pm Narendra Modi Coronavirus Vaccination : पंतप्रधानांनी आज घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

shiv sena leader sanjay raut commented on pm narendra modi coronavirus vaccination second phase above 60 cowin app | पंतप्रधानांनी घेतली कोरोनाची लस, संजय राऊतांनी लगावला टोला; म्हणाले...

पंतप्रधानांनी घेतली कोरोनाची लस, संजय राऊतांनी लगावला टोला; म्हणाले...

Next
ठळक मुद्देपंतप्रधानांनी आज घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लससरकारी रूग्णालयात मिळणार मोफत लस, खासगी रुग्णालयात द्यावे लागणार २५० रूपये

आजपासून म्हणजेच १ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं आणि त्यांना टोलाही लगावला. 

"पंतप्रधानांनी लस घेतल्यामुळे आता जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी लस घेतली त्यावर विश्वास दाखवला हे महत्त्वाचं आहे. अमेरिकेतही जेव्हा जो बायडेन यांनी लस घेतली, तेव्हा तेथील जनतेलाही ही लस आपलं रक्षण करेल असा विश्वास वाटला. आज आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे," असं राऊत म्हणाले. 

त्यांनी ही लस घेण्यामागे निवडणुकाही कारण असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याबाबत संजय राऊत यांना सवाल करण्यात आला. "याकडे सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहिलं पाहिजे. ही फक्त काँग्रेसची मक्तेदारी नाही. मोदीही काँग्रेसच्या मार्गावर पुढे जात आहेत. यापूर्वी काँग्रेसचे नेतेही अशीच भूमिका घेत होते. सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या जवळपास असतील याची काळजी घेतली जात होती. निवडणूक हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. तो त्यांच्या डोक्यात कदाचित नसेलही. ते फार सरळमार्गी आहेत," असंही ते म्हणाले. 

काय म्हणाले मोदी?

"एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीनं काम केलं, ते कौतुकास्पद आहे." तसंच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 

कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार?

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या टप्प्यात २७ कोटी नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. जवळापास १२ हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी २५० रुपये द्यावे लागतील.



तुमच्या सोयीनुसार लस घेता येणार नाही

सीरम इन्टिट्यूचची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोनच लसी भारतात उपलब्ध आहेत. लसीकरणावेळी जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागेल. आपल्या सोयीनुसार लस घेण्याची सुविधा सध्यातरी नाही. तसंच, लस घेण्यासाठीची वेळ आणि ठिकाण म्हटलं तर ते निवडण्याचा पर्याय लसीकरणाची नोंदणी करतानाच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Web Title: shiv sena leader sanjay raut commented on pm narendra modi coronavirus vaccination second phase above 60 cowin app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.