“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:52 PM2021-03-23T16:52:34+5:302021-03-23T16:54:50+5:30
शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेले पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी लोकसभेत बोलताना खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या. यानंतर मध्यंतरात शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant)
दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. आता नवनीत राणा यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार
काय म्हणाले संजय राऊत?
नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले की, यांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते, असे सांगत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...”
अरविंद सावंत यांचे स्पष्टीकरण
मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असे कधीच होणार नाही, असे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात. तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. पण धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. मागच्या एक वर्षातली त्यांची लोकसभेतली भाषणे बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात त्यांची बोलण्याची पद्धत, शब्द बघा. तुमच्या लक्षात येईल", असे अरविंद सावंत म्हणाले.