'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 07:10 PM2022-07-18T19:10:37+5:302022-07-18T22:44:41+5:30

संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

Shiv Sena leader Sanjay Raut said that if anyone tries to form a separate group in the Lok Sabha, action will be taken. | 'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा

'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा

Next

नवी दिल्ली/मुंबई- एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी शिवसेनेच्या ४० आमदारांनी, तसेच विविध मनपा आणि नगरपालिकांमधील आजीमाजी नगसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेनेच्या लोकसभेतील खासादारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. आज शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे. लोकसभेतील १९ पैकी १४ खासदारांनी हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. अनेकांनी फुटून गट निर्माण केला असेल, त्यांना कोणताही अधिकार राहिला नाही. या सर्वाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. जर लोकसभेमध्ये वेगळा गट तयार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

एकनाथ शिंदे यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेतेपद बाळासाहेबांनी तयार केले आहे. तसेच शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना आमची कार्यकारणी बरखास्त करण्याची अधिकार नाही. याचा शिवसेनेवर फरक पडणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारीणी घोषित करू शकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही यासंदर्भात केंद्रातील भाजपवर आरोप केला आहे. संसदेच्या अधिवेशनातच शिवसेना खासदारांना फोडण्याचा कट आखला जात असून दिल्लीकरांच्या दबावाखाली शिवसेना खासदार आहेत, असा थेट आरोपच गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे, शिवसेनेतील खासदारांचाही मोठा गट आता मूळ शिवेसनेपासून फारकत घेत असल्याचं सद्यपरिस्थितीवरुन दिसून येत आहे. 

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut said that if anyone tries to form a separate group in the Lok Sabha, action will be taken.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.