आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 06:26 PM2020-09-07T18:26:55+5:302020-09-07T18:35:20+5:30
केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा व्यवस्था पुरवल्यावरून राऊत म्हणाले, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. आता संजय राऊत यांनी कंगनाला 'नॉटी गर्ल' असे म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत केंद्रावरही निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा व्यवस्था पुरवल्यावरून राऊत म्हणाले, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले. मुंबई पोलिसांमुळेच बॉलीवुडमधील अंडरवर्ल्डचा खात्मा झाल्याचेही ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनीच मुंबई अंडरवर्डपासून मुक्त केली -
शिवसेना नेते राऊत म्हणाले, फिल्म इंडस्ट्री 100 वर्ष जुनी आहे. मात्र, येथे असुरक्षित वाटते, असे आजवर कुणीही म्हटले नाही. एका मुलीच्या बोलण्यावरून मुंबई पोलीस वाईट होत नाहीत. मुंबई पोलिसांनीच शहर अंडरवर्ल्डपासून मुक्त केले आहे.
'माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला -
यापूर्वी संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर, असे म्हटले होते. आता यावर स्पष्टिकरण देताना, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये पाहिली आहेत. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो.
महाराष्ट्र सरकार कंगना विरोधात, केंद्रानं दिलं संरक्षण -
मुंबईत असूरक्षित वाटते, अशा आशयाच्या कंगनाच्या वक्तव्यानंतर, कंगनाने मुंबई पोलिसांप्रती अविश्वास दाखवल्यामुळे आणि त्यांची बदनामी केल्यामुळे, तिला येथे राहण्याचा कसलाही अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा -
मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल