... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 12:47 PM2021-05-01T12:47:18+5:302021-05-01T12:48:47+5:30

Coronavirus In India : राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्ला

shiv sena leader sanjay raut slams bjp government over coronavirus conditions supreme court | ... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

Next
ठळक मुद्दे राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्लासर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली बाब, राऊत यांचं वक्तव्य

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. देशातील परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयानंदेखील केंद्र सरकारला फटकारलं होतं. तसंच काही सूचनाही केल्या होत्या. देशातील कोरोनाच्या एकंदरीत परिस्थितीवरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. 

"सध्या राष्ट्रीय स्तरावरील आपलत्ती आहे. केंद्र सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहत नसेल किंवा त्यांचं नियंत्रणही सुटलं आहे. हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय स्तरावर एक समिती नेमायला हवी. ती समिती यावरच काम करेल आणि त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. केंद्राकडून याचं नियंत्रण होणं आवश्यक आहे. राजकारण सोडूनच काम केलं तर हा देश वाचेल, अन्यथा या देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहिल," असा इशारा राऊत यांनी दिला. 

"सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली बाब आहे. त्यांनी यापूर्वीच सक्रिय व्हायला हवं होतं. आज अनेक राज्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. महाराष्ट्र लढतोय, झगडतोय आणि संघर्षही करतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाथाी अनेक योजना आखण्यात आल्या असून राज्याला ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा होणं आवश्यक आहे तो झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं निवेदन ऐका, त्यातील वेदना समजतील. सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे, पण फटकारून काय करणाऱ?," असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. 

Web Title: shiv sena leader sanjay raut slams bjp government over coronavirus conditions supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.