‘शिवसेना आणि महाराष्ट्र येऱ्यागबाळ्यांसमोर झुकणार नाही’, संजय राऊतांचे मोदी, भाजपाला आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 01:38 PM2022-02-10T13:38:44+5:302022-02-10T13:38:44+5:30

Sanjay Raut News: कितीही प्रयत्न केला, खोटं करा, दबावतंत्राचा अवलंब करा, खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमक्या द्या, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्या गबाळ्यांपुढे झुकणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

'Shiv Sena, Maharashtra will not bow down to the children', Sanjay Raut's challenge to Modi, BJP | ‘शिवसेना आणि महाराष्ट्र येऱ्यागबाळ्यांसमोर झुकणार नाही’, संजय राऊतांचे मोदी, भाजपाला आव्हान 

‘शिवसेना आणि महाराष्ट्र येऱ्यागबाळ्यांसमोर झुकणार नाही’, संजय राऊतांचे मोदी, भाजपाला आव्हान 

googlenewsNext

नवी दिल्ली - शिवसेना नेते संजय राऊत हे केंद्रीस तपास यंत्रणांकडून राज्यात सुरू असलेल्या तपासावरून भाजपाविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. कितीही प्रयत्न केला, खोटं करा, दबावतंत्राचा अवलंब करा, खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमक्या द्या, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्या गबाळ्यांपुढे झुकणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मला जे काय बोलायचे होते, ते मी काल बोललो. आता मी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईमध्ये पुढे बोलायचं आहे ते बोले. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केला, खोटं करा, दबावतंत्राचा अवलंब करा, खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमक्या द्या, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्या गबाळ्यांपुढे झुकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आणि आता शरद पवार आणि उद्धव ठाकरें असतील, इतर नेते असतील, हा महाराष्ट्राचा बाणा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल तर काढा. महाराष्ट्र हा कोरोनाचा सुपरस्प्रेडर होता, असं म्हणताय. पण लक्षात ठेवा महाराष्ट्राने जगात सर्वोत्तम काम केलं आहे. महाराष्ट्रात नदीत, समुद्रात प्रेतं पडली नाहीत. फेकावी लागली नाहीत. तरीही महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर म्हणता.  किती खोटं बोलाल. तरीही भाजपाच्या महाराष्ट्रातील एकाही नेत्यानं याचा निषेध केला नाही. हेच का तुमचं महाराष्ट्र प्रेम, हाच का तुमचा महाराष्ट्र बाणा, दिल्लीच्या दबावासमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचा युगपुरुष मानलं जातं. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. ते राजकारणासाठी नाव घेतात हे सोडून द्या. पण बाणा आमच्याकडे आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.   

Web Title: 'Shiv Sena, Maharashtra will not bow down to the children', Sanjay Raut's challenge to Modi, BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.