‘‘भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला?’’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 12:31 PM2021-03-27T12:31:03+5:302021-03-27T12:34:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना केलेल्या वक्तव्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

shiv sena mp priyanka chaturvedi questioned on pm modi bangladesh satyagraha statement | ‘‘भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला?’’

‘‘भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला?’’

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपभाजप व मोदी समर्थक आणि विरोधक आमनेसामनेशिवसेनेकडून पंतप्रधान मोदींच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित

नवी दिल्ली :पंतप्रधाननरेंद्र मोदी (pm narendra modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर गेले आहेत. कोरोना संकटाच्या काळातील पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे. ढाक्याजवळ असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, तेव्हा अटक होऊन तुरुंगवासही भोगला होता, असे म्हटले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला, अशी विचारणा केली जात आहे. (shiv sena mp priyanka chaturvedi questioned on pm modi bangladesh satyagraha statement)

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप व मोदी समर्थक आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अशातच शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे. संपूर्ण भारत बांगलादेश निर्मितीच्या बाजूने होता, तर मोदींना सत्याग्रह आंदोलन करण्याची गरज काय होती, अशी विचारणा प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. 

सत्याग्रह करण्याची काय गरज होती 

सन १९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेने केलेल्या विरोधाचा सामना करूनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते. यावेळी मला अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता, अशी आठवण पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना सांगितली. 

मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

दरम्यान, पूर्व सीमेबाबत भारत निश्चिंत आहे. कारण भारतासोबत बांगलादेश उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी लढण्यासाठी मदत मिळाली, असे कौतुकोद्गार बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच विरोधी पक्षनेत्यांशीही पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली.

Web Title: shiv sena mp priyanka chaturvedi questioned on pm modi bangladesh satyagraha statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.