पालघर प्रकरणाचं राजकारण केलंत, पण बुलंदशहरचं करू नका; संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:38 AM2020-04-28T11:38:34+5:302020-04-28T12:17:52+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजपावर अप्रत्यक्ष टीका

shiv sena mp sanjay raut reacts after 2 sadhu killed in uttar pradesh kkg | पालघर प्रकरणाचं राजकारण केलंत, पण बुलंदशहरचं करू नका; संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष बाण

पालघर प्रकरणाचं राजकारण केलंत, पण बुलंदशहरचं करू नका; संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष बाण

googlenewsNext

मुंबई: पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याची घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची निर्घृणपणे खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरुन ग्रामीण भागात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कारवाई करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

बुलंदशहरमध्ये दोन साधूंची रात्री हत्या करण्यात आली. या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाष्य केलं. 'अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी अदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात होते. सोमवारी रात्री या दोन्ही साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मंदिराच्या आवारातच पडल्याचे दिसून आले. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. 

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेमागचं कारण अस्पष्ट आहे. ग्रामस्थांनी एका तरुणावर संशय व्यक्त  केला असून पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील पालघर येथेही दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

लॉकडाऊन नेमका कसा हटणार?; मोदी सरकारकडून 'एक्झिट प्लान'वर काम सुरू

३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

मुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना

Web Title: shiv sena mp sanjay raut reacts after 2 sadhu killed in uttar pradesh kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.