बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले? समोर आली माहिती, आकडा पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 09:44 PM2022-07-01T21:44:39+5:302022-07-01T21:45:45+5:30

Maharashtra Political Crisis: सर्व बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या आणि या सर्वांनी तेथे ८ दिवस तळ ठोकला होता.

shiv sena rebel eknath shinde group paid all bills of hotel radisson blu in guwahati know the bill amount | बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले? समोर आली माहिती, आकडा पाहून व्हाल अवाक्

बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले? समोर आली माहिती, आकडा पाहून व्हाल अवाक्

Next

गुवाहाटी:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. विधान परिषदेची निवडणूक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आणखी काही आमदारांनी बंडखोरी केल्याचे वृत्त धडकले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. २१ जून रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर सूरतमधील एका हॉटेलात राहिले होते. मात्र, त्याच दिवशी मध्यरात्री सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना झाले. 

गुवाहाटीमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदारांची सोय करण्यात आली होती. या हॉटेलमध्ये जवळपास ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. या हॉटेलमध्ये या सर्व आमदारांनी जवळपास ७ दिवस तळ ठोकला होता. राज्यातील सत्ता संघर्ष पराकोटीला पोहोचल्यावर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्याच दिवशी सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल सोडून गोव्यातील दोनापावला येथील ताज कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी दाखल झाले. 

बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले?

रॅडिसन ब्ल्यूमधील हॉटेलचे बिल एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भरले आहे. यासंदर्भात हॉटेल व्यवस्थापनाने माहिती दिली. मात्र, शिंदे गटाच्या मुक्कामावर नेमका किती खर्च झाला, हे सांगितले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंनी किमान ६८ ते ७० लाख रुपये इतकी रक्कम हॉटेलचे भाडे म्हणून चुकती केली. शिंदे गटाच्या मुक्कामासाठी हॉटेलच्या विविध मजल्यांवर एकूण ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. आमदारांचा मुक्काम असल्याने हॉटेल व्यवस्थापनाने २२ ते २९ जून दरम्यान अन्य ग्राहकांसाठी रेस्रॉ, बँक्वेट आणि इतर सुविधा बंद केल्या होत्या.

पूर्ण बिल देण्यात आले आहे

हॉटेलमधील एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून आलेले आमदार सामान्य पाहुण्यांप्रमाणेच थांबले होते. त्यांच्याकडून पूर्ण बिल देण्यात आले आहे. मात्र, या अधिकाऱ्याने बिलाची रक्कम सांगण्यास नकार दिला. शिंदे गटातील आमदारांचा मुक्काम सुपीरियर आणि डिलक्स खोल्यांमध्ये अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या संकेतस्थळानुसार, एका खोलीचे भाडे ग्राह्य धरल्यास सवलत आणि कर धरून ७० खोल्यांचे भाडे जवळपास ६८ लाख रुपयांच्या घरात जाते. तर ८ दिवसांच्या जेवणावर झालेला खर्च अंदाजे २२ लाख रुपये इतका आहे. आमदारांनी अन्य कोणत्या सुविधांचा लाभ घेतला का, असा प्रश्न हॉटेल अधिकाऱ्यांनी विचारण्यात आला. त्यावर खोलीच्या भाड्यात अंतर्भूत असलेल्या सुविधा वगळता आमदारांनी इतर कोणत्याही सोयी घेतल्या नाहीत, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.
 

Web Title: shiv sena rebel eknath shinde group paid all bills of hotel radisson blu in guwahati know the bill amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.