याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल; दुटप्पी भूमिकेवरून सडेतोड पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:28 PM2022-06-28T19:28:08+5:302022-06-28T19:28:48+5:30

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विधानांवरून आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत पलटवार केला आहे.

shiv sena rebel eknath shinde replied cm uddhav thackeray over aditya thackeray and sanjay raut statement | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल; दुटप्पी भूमिकेवरून सडेतोड पलटवार

याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल; दुटप्पी भूमिकेवरून सडेतोड पलटवार

googlenewsNext

गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अलिबाग येथील मेळाव्यात बंडखोरांवर पुन्हा एकदा जहरी टीका केली. याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंडखोरी केल्यापासून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सातत्याने त्यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गटावर सातत्याने टीका केली. तर संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह भाषेत शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. शिंदे गटाकडूनही यावर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, प्रथमच खुद्द एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले असून, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. 

#donttrickmaharashtra

“एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. तसेच यावेळी #donttrickmaharashtra असा नवा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असे एक पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.
 

Web Title: shiv sena rebel eknath shinde replied cm uddhav thackeray over aditya thackeray and sanjay raut statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.