Parliament Winter Session 2021: “आता आम्ही पाहू, किसमें कितना है दम”; खासदार निलंबनावरुन संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:09 PM2021-12-14T15:09:18+5:302021-12-14T15:10:48+5:30

Parliament Winter Session 2021: आतापर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt on issue of 12 mp suspended from rajya sabha | Parliament Winter Session 2021: “आता आम्ही पाहू, किसमें कितना है दम”; खासदार निलंबनावरुन संजय राऊत संतापले

Parliament Winter Session 2021: “आता आम्ही पाहू, किसमें कितना है दम”; खासदार निलंबनावरुन संजय राऊत संतापले

Next

नवी दिल्ली:संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, राज्यसभेने खासदारांचे निलंबन केल्यावरून विरोधकांमध्ये अद्यापही तीव्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही १२ दिवसांपासून महात्मा गांधींच्या चरणांशी बसलो होतो. आज दुसऱ्या गांधींसोबत आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आता आम्ही पाहू, किसमे कितना है दम, या शब्दांत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

लोकशाही आणि न्यायाची मागणी करणाऱ्या आमच्या १२ खासदारांना निलंबित केले. आम्ही लढू आणि लढत राहू. आम्ही झुकणार नाही आणि घाबरणार नाही, हाच संदेश देशाला देऊ इच्छितो. आमचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, लोकशाहीचा आवाज पूर्ण देशापर्यंत पोहोचायला हवा. सरकार जोपर्यंत आमचे म्हणणे मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा आवाज घुमत राहील, असे संजय राऊत यांनी स्पष्टपमे सांगितले.  

लोकशाहीमध्ये असा दिवस पाहायला मिळाला नव्हता

आम्ही अध्यक्षांकडे मागणी केली की, आम्हालाही निलंबित करा. तर त्यांनी सरकारकडे बघून सांगितले की, त्यांना सांगा तुम्हाला निलंबित करायला. याचा अर्थ अध्यक्षांचे अधिकार सरकारकडे आहेत. सरकारला वाटले तर निलंबित करतील, सरकारला वाटले, तर निलंबन मागे घेतील, असा दावा करत आजपर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 

लोकशाही वाचवा आणि आम्हाला न्याय हवा

गेल्या २ आठवड्यांपासून हा संघर्ष सुरू आहे. हे फक्त १२ खासदारांचे निलंबन नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आमच्या खासदारांचे हे सर्वात मोठे बलिदान आहे. सरकार ऐकायला तयार नाही. आम्ही सदनात आंदोलन सुरू केले, तेव्हा आमची मागणी होती लोकशाही वाचवा आणि आम्हाला न्याय हवा. पण लोकशाही आणि न्याय हे शब्द सरकारला ऐकायचे नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. दरम्यान, गेल्या १० ते १२ दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सरकारचा निषेध करत आंदोलन केले जात असताना राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी संसदेबाहेर जमत मोदी सरकारवर टीका केली आहे. 
 

Web Title: shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt on issue of 12 mp suspended from rajya sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.