Assembly Election Results Live: हा पराभव म्हणजे जनतेचा राग; निकालानंतर शिवसेनेचा भाजपाविरोधी 'राग'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:38 PM2018-12-11T12:38:39+5:302018-12-11T12:41:08+5:30
निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा भाजपाला टोला
Next
नवी दिल्ली: छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला धक्के बसल्यावर आता मित्रपक्ष शिवसेनेनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा पराभव म्हणजे जनतेचा राग असल्याचं टीकास्त्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोडलं आहे. भाजपानं जनतेचा राग समजून घ्यावा आणि आत्मपरिक्षण करावं, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: I won't say these are victories of Congress but this is an anger of the people. Self-reflection is needed #AssemblyElections2018pic.twitter.com/YL1gNECx5a
— ANI (@ANI) December 11, 2018
पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहेत. भाजपाच्या ताब्यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं भाजपाला धक्का दिला आहे. यापैकी छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं भाजपाची धूळधाण उडवली आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील ही राज्यं भाजपासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या दीड दशकापासून भाजपा सत्तेत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.