४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:15 PM2023-11-10T23:15:21+5:302023-11-10T23:22:42+5:30
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा इथं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे
नवी दिल्ली - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यात होणा-या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने भाजपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे पत्र भाजपाचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांना लिहिलं आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर शिवसेना नेते या राज्यात प्रचाराला जाणार आहेत. आज शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी जे.पी नड्डा यांची भेट घेऊन मुख्यमंत्री शिंदेंनी लिहिलेलं हे पत्र सुपूर्द केले.
या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलंय की, माझ्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष, जो हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेवर चालला आहे. याच विचारधारेतून आम्ही पुन्हा एकदा एनडीए आघाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सहभागी झालो. शिवसेना पक्षाचे देशातील विविध राज्यात सक्रीय युनिट आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील निवडणुकीत आम्ही प्रचारात सहभागी होऊन भाजपा उमेदवारांना पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितले.
I thank Maharashtra CM Shri @mieknathshinde Ji and leaders of Shiv Sena for extending full support to BJP for the Assembly Elections of Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, and Telangana.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) November 10, 2023
Under the visionary leadership of Hon. PM Shri @narendramodi Ji, NDA remains committed… pic.twitter.com/Hv6OC1hssV
त्याचसोबत मी आमच्या सर्व राज्याच्या प्रमुखांना स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासदार राहुल शेवाळे, मुख्य समन्वयक आशिष कुलकर्णी, शिवसेना सचिव अभिजीत अडसूळ हे आमचे शिष्टमंडळ भाजपाशी संपर्कात राहतील. त्याचसोबत आपणही चांगल्या समन्वयासाठी भाजपा मुख्यालयातील एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रातून भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांना केली आहे.
दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा इथं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपासोबत शिवसेनेची २५ वर्ष युती होती. त्यामुळे या ४ राज्याच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार शिवसेनेकडून केला जाईल. स्वत: मुख्यमंत्रीही प्रचाराला जाणार आहेत. एनडीएच्या माध्यमातून भाजपाला यश मिळावे यासाठी शिवसेना तत्पर असणार आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.