Maharashtra Karnataka Border Dispute: “अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 03:07 PM2022-12-14T15:07:56+5:302022-12-14T15:09:03+5:30

Maharashtra Karnataka Border Dispute: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ अमित शाहांना भेटल्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

shiv sena thackeray group mp arvind sawat reaction over amit shah meeting on maharashtra karnataka border dispute | Maharashtra Karnataka Border Dispute: “अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी

Maharashtra Karnataka Border Dispute: “अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी

googlenewsNext

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकावर टीका करताना दिसत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक बैठक बोलावली असून, यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या खासदाराने केली आहे. 

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यावेळी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शाह यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे शाह यांचे आभार. आमच्या मागणीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात

केंद्र सरकारची भूमिका न्यायिक राहिली पाहिजे. तराजू झुकता कामा नये. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात. कर्नाटकाच्या भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं सांगायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले होते. ते मराठी उमेदवार निवडून आणा असं सांगायला गेले नव्हते, अशी टीका करताना दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाह यांनी सर्वांत आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, मुख्यमंत्र्यांचे कान उपटावे. बसवराज बोम्मई यांना वाह्यात स्टेटमेंट द्यायला मनाई करा. तिथला हिंसाचार बंद करा. जतमध्ये कन्नड रक्षण वेदिका येथे आणि झेंडा फडकवते हे सर्व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे पुरस्कृत आंदोलन आहे. हे सर्व कर्नाटकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालले आहे. हे लपून राहिलेले नाही, असे सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, गेल्या ७० वर्षापासून मराठी माणसांचा छळ सीमाभागात सुरू आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत. शहांची सासरवाडी कोल्हापूरला त्याचे चटके बसतायेत. त्यामुळे त्यांना याची कल्पना असेल. न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं पण २०-२५ लाख मराठी माणसे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. फक्त सीमाभागाचा विषय नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगतायेत, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Read in English

Web Title: shiv sena thackeray group mp arvind sawat reaction over amit shah meeting on maharashtra karnataka border dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.