'रईस'ला शिवसेनेची धमकी
By admin | Published: January 11, 2017 06:14 PM2017-01-11T18:14:59+5:302017-01-11T18:20:07+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रईस सिनेमा प्रदर्शीत होण्याच्या अडचणी संपतील असा विचार अभिनेता शाहरूख खानने केला असेल . मात्र,
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 11 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रईस सिनेमा प्रदर्शीत होण्याच्या अडचणी संपतील असा विचार अभिनेता शाहरूख खानने केला असेल . मात्र, शाहरूखच्या अडचणी अजून संपलेल्या दिसत नाहीत.
रईस चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची धमकी छत्तीसगडच्या शिवसेना शाखेने दिली आहे. रईस चित्रपटाच्या वितरकाला धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. अजय राठी नावाच्या एका वितरकाला हे पत्र पाठवण्यात आलं आहे. चित्रपट प्रदर्शित केल्यास गंभीर परिणाम भोगायला तयार राहा अशा आशयाचं हे पत्र आहे. रईसमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आहे. येत्या 25 जानेवारीला शाहरूखचा रईस प्रदर्शीत होणार आहे.
Dear @AUThackeray,
— Akshaye Rathi (@akshayerathi) 10 January 2017
We have received this threat letter from your Chhattisgarh unit against playing @iamsrk's #Raees. Do you endorse it? pic.twitter.com/RHai71yGZV
अजय राठीने हे धमकीचं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. तसेच शाहरूखच्या चाहत्यांकडे मदत मागितली आहे. छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालायालाही योग्य सुरक्षा पुरवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. ट्वीटरवर टॅग करून राठी यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही तुम्ही या धमकीचं समर्थन करतात का? अशी विचारणा केली आहे.