कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 05:44 PM2018-04-01T17:44:19+5:302018-04-01T17:44:19+5:30

गोवा आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार

Shiv Sena will fight 50 to 55 seats in Karnataka | कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार

कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार

googlenewsNext

मुंबई : गोवा आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार आहे. कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार आहे. शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.  महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना पाठिंबा देणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. राज्यपालाच्या अभिभाषाणात सीमा भागाचा उल्लेख असतो, हे त्यांना शोभणारे नाही, असेही राऊत म्हणाले. 

आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मते पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर दुसरीकडे, शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कथित उंदीर घोटाळ्यावरुन विरोधकांना उत्तर देताना 2019 मध्ये वाघ-सिंह एकत्रच लढतील, असे संकेत दिले.

Web Title: Shiv Sena will fight 50 to 55 seats in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.