शिवसेना, आप पक्षाच्या देणग्यांची बेरीज काँग्रेसपेक्षाही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 04:17 AM2018-09-10T04:17:03+5:302018-09-10T04:17:22+5:30

२०१५-१६ व २०१६-१७ या वित्तीय वर्षांमध्ये शिवसेना व आप या प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांची बेरीज केली तर ती राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालेल्या निधीपेक्षाही अधिक भरते.

Shiv Sena, you get more than Congress's sum of donations | शिवसेना, आप पक्षाच्या देणग्यांची बेरीज काँग्रेसपेक्षाही जास्त

शिवसेना, आप पक्षाच्या देणग्यांची बेरीज काँग्रेसपेक्षाही जास्त

Next

नवी दिल्ली : २०१५-१६ व २०१६-१७ या वित्तीय वर्षांमध्ये शिवसेना व आप या प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांची बेरीज केली तर ती राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालेल्या निधीपेक्षाही अधिक भरते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांचा ओघ खूपच कमी झाला आहे.
२०१६-१७ साली ३१ प्रादेशिक पक्षांना किती देणग्या मिळाल्या यासंदर्भातील अहवाल असोशिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेने गेल्या महिन्यात तर त्याच वित्तीय वर्षात राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा अहवाल एडीआरने चालू वर्षाच्या प्रारंभी प्रसिद्ध केला होता. २००१-०२ या वित्तीय वर्षापासून राजकीय पक्षांना किती देणग्या मिळाल्या याचा तपशील एडीआरने आपल्या वेबसाइटवर दिला आहे. त्यानूसार २००४-०५ व २००८-०९ या कालावधीत म्हणजे यूपीए सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत काँग्रेस व भाजपाला मिळालेल्या देणग्यांची रक्कम जवळपास सारखीच होती. मात्र यूपीए सरकारच्या दुसºया कारकिर्दीत भाजपाला काँग्रेसपेक्षा दुप्पट व मोदी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या तीन वर्षांत भाजपला काँग्रेसपेक्षा पाचपट अधिक देणग्या प्राप्त झाल्या.
निवडणुका लढविण्यासाठी व पक्षकार्यासाठी प्रचंड पैसा लागतो. तो खर्च भागविण्यासाठी राजकीय पक्षाला पुरेसा निधी गाठीशी असणे गरजेचे असते. देशभरात जनतेकडून देणग्या गोळा करण्यासाठी ४० दिवसांची जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने नुकताच एका बैठकीत घेतला. देणग्या देण्यासाठी जनतेला आवाहन करण्याची काँग्रेसमध्ये जुनी परंपरा आहे. उद्योगसमुहांकडून मिळणारा निधी आटल्यामुळे हे पाऊल काँग्रेसला पुन्हा उचलावे लागले आहे.
>भाजपाला मिळाला ५३२ कोटी रुपयांचा निधी
२०१६-१७ या वर्षात भाजपाला ५३२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. काँग्रेसला ४२ कोटी, आप व शिवसेनेला अनुक्रमे २६ व २५ कोटी रुपयांचा, तर शिरोमणी अकाली दलाला १५ कोटींचा निधी मिळाला. आप, शिवसेनेच्या रकमेची बेरीज केली, तर ती ५१ कोटी म्हणजे काँग्रेसला प्राप्त झालेल्या देणग्यांपेक्षाही जास्त होते. २०१४-१५ या वित्तीय वर्षात राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण निधीपैकी काँग्रेसच्या वाट्याला तीस टक्के रक्कम आली होती. मात्र, त्यानंतर हा टक्का घसरतच गेला.

Web Title: Shiv Sena, you get more than Congress's sum of donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.