शिवसेना सोडणार मोदी सरकारचा हात, शिवसेना नेत्याचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 10:58 PM2018-04-08T22:58:46+5:302018-04-08T22:58:46+5:30

आता चार वर्षांनंतर भाजपला मित्र पक्षांची कुठे आठवण झाली आहे. एनडीए मधून जसे चंद्राबाबू नायडू बाहेर पडले त्याप्रमाणे आता शिवसेना देखील भाजपाला धडा शिकवेल

Shiv Sena's statement will leave Shivsena, handover of Shiv Sena leader | शिवसेना सोडणार मोदी सरकारचा हात, शिवसेना नेत्याचे वक्तव्य

शिवसेना सोडणार मोदी सरकारचा हात, शिवसेना नेत्याचे वक्तव्य

Next

मनोहर कुंभेजकर!

मुंबई - 2019 मध्ये भाजपा सत्तेवर येणार असल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सहा महिन्यांपूर्वी करत होते.आता भाजपची भाषा बदलली असून 2019 मध्ये एनडीएचे सरकार सत्तेवर येणार असल्याची घोषणा भाजपा करत आहे. आता चार वर्षांनंतर भाजपला मित्र पक्षांची कुठे आठवण झाली आहे. एनडीए मधून जसे चंद्राबाबू नायडू बाहेर पडले त्याप्रमाणे आता शिवसेना देखील भाजपाला धडा शिकवेल असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज रात्री कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे केली. कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम)एकनाथ शिंदे येथे आगमन झाले.

मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर सायंकाळी उत्तर भारतीय सम्मान संमेलनाचे आयोजन कांदिवली (पूर्व)येथील भूमी व्हॅली समोरील खेळाचे मैदान,ठाकूर स्टेडियम समोर,ठाकूर व्हिलेज येथे केले होते.यावेळी मुंबईच्या विकासात आणि कला, क्रीडा,शिक्षा,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्तर भारतीय प्रतिष्टीत नागरिकांचा यावेळी उद्योगमंत्रांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला.यावेळी विभागप्रमुख विलास पोतनीस,महिला विभागसंघटक रश्मी भोसले,उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष हेमंत पांडे,प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे, स्थानिक नगरसेविका माधुरी भोईर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेच्या गेल्या 23 जानेवारीच्या राष्ट्रीय मेळाव्यात आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.त्यामुळे शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असून त्या जिंकणार आहे.यासाठी सर्व शिवसैनिक,पदाधिकारी,आमदार,खासदार,आणि मंत्री देखिल आगामी निवडणुकीत शिवसेनेला विजयी करण्यासाठी जोरदार सज्ज झाले असल्याचे सुभाष देसाई यांनी अभिमानाने सांगितले.या ऊत्तर भारतीय सन्मान संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्धल त्यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांचे जाहिर कौतूक केले.शिवसेना ही ऊत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.


6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला.मी व खासदार गजानन किर्तीकर यांच्यासह हजारो शिवसैनिक अयोध्येत त्यावेळी गेले होते.बाबरी मशीद कोणी तोडली यावर भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद मूग गिळून बसली होती.यावर बीबीसीच्या पत्रकाराने शिवसेनाप्रमुखांना विचारले की,बाबरी मशीद कोणी तोडली,यावर क्षणाचा विलंब न लावता जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरीं मशीद तोडली असेल तर मला त्यांचा रास्त अभिमान आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले ही आठवण त्यांनी सांगितली."मंदिर वही बनाऐंगे"ही घोषणा भाजपा करते आहे,मात्र कल्याणसिंग,राजनाथ सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते,आता आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री आहेत.मग आयोध्येत राम मंदिर का नाही बांधले गेले असा सवाल सुभाष देसाई यांनी केला.जेव्हा जेव्हा हिंदूंवर अन्याय झाला त्यावेळी हिंदूंच्या मागे खंबीरपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें उभे राहिले असे त्यानी अभिमानाने सांगितले.

उत्तर भारतीयांना काही जणांनी मारपीठ केली होती,त्यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती असे गौरवोद्गार मंत्रीमहोदय एकनाथ शिंदे यांनी काढले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भसरतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे असून अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेने नगरसेवक व इतर महत्वाची पदे दिल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.शिवसेना व उत्तर भारतीय यांचे नाते असेच वाढीस लागो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. एकीकडे भाजपाने नुकतेच बिकेसी येथील संमेलनात लाखोंच्या संख्येने शक्ति प्रदर्शन केले असतांनाच,आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने देखिल आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे.

"उत्तर भारतीय के सन्मान मे आमदार प्रकाश सुर्वे मैदानमे " असे चित्र  या संमेलनात होते.आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने उत्तर भारतीय नागरिकांना साद घातल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.आणि उत्तर भारतीय नागरिक व महिला आणि लहान मुले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी मुंबईच्या विकासात आणि कला, क्रीडा,शिक्षा,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्तर भारतीय प्रतिष्टीत नागरिकांचा  खास सत्कार करण्यात आला.

या संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे भोजपुरी रंगा रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार खेसारीलाल यादव व प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिह यावेळी उपस्थित होते.त्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई व एकनाथ शिंदे  यांच्या सह उत्तर भारतीय नागरिकांनी जोरदार दाद दिली.

याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले की,मागाठाणे विधानसभेत उत्तर भारतीय नागरिकांचे शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते असून त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात उत्तर भारतीयांचे मोठे योगदान आहे.तर 2017 च्या मुंबई महानगर पालिकेत त्यांनी मागाठाणेतून 8 पैकी शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडुन दिले. त्यामुळे त्यामुळे त्यांचे ऋण व्यक्त करून त्यांच्या मनोरंजनासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील मान्यवर नागरिकांचा सत्कार करण्यासाठी या सन्मान संमेलनाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Shiv Sena's statement will leave Shivsena, handover of Shiv Sena leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.