गुलाम अलींच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा राडा
By admin | Published: January 15, 2016 07:25 PM2016-01-15T19:25:37+5:302016-01-15T19:25:37+5:30
केरळ मधील त्रिवेंद्रममध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमादरम्यान निदर्शने करत त्यांना विरोध दर्शवला आहे, मागील काही दिवसापासून शिनसेना
ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. १५ - ‘कल चौदहवीं की रात थी’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा..’ आणि ‘हंगामा है क्यूँ बरपा...’ अशा एकाहून अनेक सरस गझला लोकप्रिय करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पटियाला घराण्याचे गायक गुलाम अली हे केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणाने शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे आज केरळ मधील त्रिवेंद्रममध्ये होणाऱ्या त्यांच्या गझल गायनाचा कार्यक्रमात शिवसेनेने पुन्हा आपले रुप दाखवले.
केरळ मधील त्रिवेंद्रममध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमादरम्यान निदर्शने करत त्यांना विरोध दर्शवला आहे, मागील काही दिवसापासून शिनसेना पाकिस्तानी गजल गायक गुलाम अली यांच्या गजलच्या कार्यक्रमास विरोध करत आहे, गुलाम अलींनी पाकिस्तानला परत जावे परत जावे अश्या घोषणा देत. कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणाच्या बाहेर घोषणा दिल्या जात होत्या.
गेल्यावर्षी शिनसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींनी मुंबईतील आपला कार्यक्रम रद्ध केला होता व आपण मुंबईत पुन्हा कधीही येणार नसल्याचं त्यांनी सांगीतले होते. तर मागील काही दिवसापुर्वी गुडगावमधील कार्यक्रमात शिवसेनेने विरोध दर्शवला होता.
मध्यंतरी लखनौत महोत्सवादरम्यान गायनाची तयारी दर्शविली आसता शिवसेनेने आपले विरोधाचे शस्त्र उगारले होते. गुलाम अली यांची सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखीच गत व्हावी अशी उत्तर प्रदेश सरकारची इच्छा असल्यास त्यांना आमंत्रण द्यावे, अशी धमकी शिवसेने गुलाम अली यांना दिली होती. ३ डिसेंबर २०१५ च्या महोत्सवात गुलाम अली गाणार असल्याचे लखनौ प्रशासनाने जाहीर केल्यानंतर. ह्यजवान बलिदान देत असताना पाकिस्तानी गायकाच्या गझलांचा आस्वाद घ्यायचा हे आम्हाला मान्य नाही, असे सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल सिंग यांनी सांगितले होते.