Shivaji Maharaj: शिवाजी महाराज भारत देशाचा गौरव, छत्रपतींसमोर पंतप्रधान नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 09:54 AM2022-02-19T09:54:00+5:302022-02-19T09:56:11+5:30

देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. राज्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात

Shivaji Maharaj: Shivaji Maharaj is the pride of the country, the Prime Minister narend modi bows before Chhatrapati | Shivaji Maharaj: शिवाजी महाराज भारत देशाचा गौरव, छत्रपतींसमोर पंतप्रधान नतमस्तक

Shivaji Maharaj: शिवाजी महाराज भारत देशाचा गौरव, छत्रपतींसमोर पंतप्रधान नतमस्तक

googlenewsNext

नवी दिल्ली - महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. आज मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. सोशल मीडिया शिवमय झाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय.

देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. राज्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी या उत्सवातून सामाजिक भान जपलं जातं. महाराजांच्या उंचच उंच मूर्तीची पुजा होते, अश्वारुढ पुतळ्यांच मिरवणूकही निघते. तर, अनेक कलाकार आपल्या कलेतून महाराजांची प्रतिमा साकारतात. महाराजांना देशभरातून अभिवादन होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी जयंतीदिनी शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केलं आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त मोदींनी ट्विट करुन अभिवादन केलंय, तसेच शिवाजी महाराज हे महान महानायक आणि भारताचा गौरव असल्याचं मोदींनी म्हटलंय. ठाणे-दिवा खंडावरील दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांचे (पांचवीं और छठी) उद्घाटन केल्यानंतर आणि नवीन उपनगरीय रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर शुक्रवारी ते बोलत होते. मोदींनी ट्विट करुनही, ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत'', असे मोदींनी म्हटले आहे. 


 

Web Title: Shivaji Maharaj: Shivaji Maharaj is the pride of the country, the Prime Minister narend modi bows before Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.