पेंगाँग सरोवराच्या काठावर शिवरायांचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 08:41 IST2024-12-29T08:38:44+5:302024-12-29T08:41:34+5:30

लेहमधील अत्यंत धाडसी म्हणून ओळख असलेल्या लष्कराच्या १४ व्या तुकडीने म्हटले आहे की, या महान राजाबद्दलचा आदर आणि त्यांनी दिलेला वारसा कायम प्रेरणेचा स्रोत असल्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे...

Shivaji statue on the banks of Pengong Lake | पेंगाँग सरोवराच्या काठावर शिवरायांचा पुतळा

पेंगाँग सरोवराच्या काठावर शिवरायांचा पुतळा

नवी दिल्ली : लडाखमध्ये १४,३०० फूट उंचीवर पेंगाँग सरोवराच्या किनारी भारतीय लष्कराने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. चीनलगत असलेल्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे. 

लेहमधील अत्यंत धाडसी म्हणून ओळख असलेल्या लष्कराच्या १४ व्या तुकडीने म्हटले आहे की, या महान राजाबद्दलचा आदर आणि त्यांनी दिलेला वारसा कायम प्रेरणेचा स्रोत असल्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे. लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. 

भारत-चीन सीमेवर ज्या दोन शेवटच्या टोकांवर वाद झाले त्या डेमचोक व देपसांग भागांतून लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांनी हे अनावरण करण्यात आले आहे. 

या भागातून सैन्य मागे घेण्यावर पेंगाँग सरोवराच्या भागात हिंसक चकमकीनंतर ५ मे २०२० रोजी पूर्व लडाख सीमेवर दोन्ही देशांत वाद निर्माण झाला होता.

Web Title: Shivaji statue on the banks of Pengong Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.