शिवाजीनगर रस्त्याने घेतला मोकळा श्वास अतिक्रमण विभागाची कारवाई: नागरिकांनी सुरेशदादांकडे केली होती तक्रार
By Admin | Updated: October 25, 2016 22:39 IST2016-10-25T22:39:32+5:302016-10-25T22:39:32+5:30
जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शिवाजीनगरातील रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण व दारू विक्रीच्या गाड्यांवर कारवाई करीत रस्ता मोकळा केला.

शिवाजीनगर रस्त्याने घेतला मोकळा श्वास अतिक्रमण विभागाची कारवाई: नागरिकांनी सुरेशदादांकडे केली होती तक्रार
ज गाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शिवाजीनगरातील रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण व दारू विक्रीच्या गाड्यांवर कारवाई करीत रस्ता मोकळा केला. याबाबत नागरिकांनी माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडे निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याबाबत मागणी केली होती. त्यावर सुरेशदादांनी महापौरांना या विषयात लक्ष घालण्याची सूचना केली होती. महापौरांनी आयुक्तांकडे हा विषय सोपविल्यानंतर मंगळवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करीत रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. तसेच अनधिकृत धंद्यांसाठी उभारलेल्या शेडही तोडल्या. सकाळी मनपा अतिक्रमण विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले. शिवाजीनगर पूल ते एस.के. ऑईल मिल पर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण, दारू विक्री, अवैध धंदे यामुळे महिलांना या रस्त्याने ये-जा करणेही मुश्कील होत असल्याची तक्रार असल्याने मनपाने या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी अर्ध्यातासाची मुदत दिली. त्यामुळे बहुतांश लोटगाड्या तसेच शेडचे अतिक्रमणही अतिक्रमणधारकांनी स्वत:हून काढून घेतले. त्यानंतरही दोन टपर्यांचे अतिक्रमण कायम असल्याने त्या टपर्या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या. तसेच काही शेडचे अतिक्रमणही तोडण्यात आले. हॉकर्सविरुद्ध आज याचिकाहॉकर्सकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याची याचिका मनपाकडून बुधवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे. तसेच हॉकर्सच्यावतीने खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी मनपाकडून होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरही बुधवारी कामकाज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.