शिवाजीरोड झाला १५ फुटांनी रूंद व्यापार्यांचा आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद : स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास प्रारंभ; तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी
By admin | Published: March 6, 2016 10:06 PM2016-03-06T22:06:28+5:302016-03-06T22:06:28+5:30
सोबत फोटो-
Next
स बत फोटो-जळगाव: महापालिका आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजीरोडवरील व्यापार्यांनी १०० वर्षांहून अधिक काळापासूनचे शेडचे अतिक्रमण रविवारी स्वत:हून काढण्यास प्रारंभ केला. शहराच्या विकासात आपलेही योगदान असावे या भावनेने हे शेड व ओट्यांचे अतिक्रमण स्वत:हून काढून घेत असल्याचे सांगतानाच आता आयुक्तांनीही शब्द पाळत मोकळ्या झालेल्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी या व्यापार्यांनी केली. सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात प्रमुख ११ रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्यात आले. तर दुसर्या टप्प्यात शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाला विक्रेत्या हॉकर्सचे स्थलांतर हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी फळ विक्रेत्यांना गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर तर अन्य हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटलगतच्या मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.शिवाजीरोड या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या दुकानांच्या शेडचे तसेच ओटे, पायर्यांचे अतिक्रमण होते. दोन्ही बाजुंनी ४० व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. यातील बहुतांश व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. गेल्या आठवड्यात मनपा अतिक्रमण विभाग व नगररचना विभागाने या भागात फिरून किती अतिक्रमण झालेे याच्या सिमा आखुन दिल्या होत्या. दिलेल्या जागेपेक्षा बहुतांश जण १० ते १२ फुट पुढे आल्याचे लक्षात आले होते. यावेळी काही व्यावसायिकांनी मनपा कर्मचार्यांशी वादही घातला होता. त्याबाबत मनपा आयुक्तांच्या आदेशावरून नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी राबविलेल्या प्रमुख रस्त्यांच्या मोजमापाच्या मोहीमेत अतिक्रमीत जागेची मोजणी करून त्यावर चिन्हांकीत करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह अन्य अधिकार्यांनी भेट देऊन शिवाजी रोडवरील ४० व्यावसायिकांना रविवारपर्यंत अतिक्रमणे काढा अन्यथा सोमवारी बुलडोझर फिरवला जाईल असा इशारा दिला होता. आवाहनाला प्रतिसादमनपा आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भगीरथ पांडुरंग मेडिकलचे संदीप मंडोरा, चैतन्य मेडिकलचे विजय जोशी, तसेच जितेंद्र मुंदडा आदी दुकानदारांनी पुढाकार घेत रविवारी सकाळी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास प्रारंभ केला. त्यामुळे अन्य दुकानदारांनीही स्वत:हून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ करीत चांगला पायंडा पाडला.