बागेश्वर बाबांसोबत लग्न करायचंय; MBBSच्या विद्यार्थिनीचा इरादा, कुटुंबीयांसह सुरू केली पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:43 PM2023-06-06T12:43:36+5:302023-06-06T12:43:59+5:30
dhirendra shastri news : आता तरूणींमध्ये देखील बागेश्वर बाबांची क्रेझ दिसत आहे.
Bageshwar Dham : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कार्यक्रमांचे विविध राज्यांमध्ये आयोजन केले जात आहे, काही ठिकाणी त्यांना विरोध देखील झाल्याचे पाहायला मिळाले. पण धीरेंद्र शास्त्री यांना ऐकण्यासाठी उसळलेला जनसमुदाय चर्चेचा विषय बनतो. लाखोंच्या संख्येने जमणारी गर्दी धीरेंद्र शास्त्रींच्या लोकप्रियतेची साक्ष आहे. देशासह विदेशात देखील त्यांचे भक्त पाहायला मिळत आहेत. आता तरूणींमध्ये देखील बागेश्वर बाबांची क्रेझ दिसत आहे.
दरम्यान, एका एमबीबीएसच्या तरूणीने धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे (MBBS student wants to marry Baba Bageshwar). संबंधित विद्यार्थिनीने तिची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी डोक्यावर गंगाजल घेऊन गंगोत्री धाम ते बागेश्वर धाम अशी पदयात्रा देखील सुरू केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे विद्यार्थिनीचे वडील आणि भाऊही तिच्यासोबत पदयात्रा काढत आहेत.
"मी १६ तारखेची वाट पाहत आहे"
धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत लग्न करण्यासाठी प्रार्थना करत असलेल्या तरूणीचे नाव शिवरंजनी तिवारी असे आहे. ती बागेश्वर बाबांसोबत लग्न करण्यास इच्छुक आहे. शिवरंजीने पदयात्रा सुरू केली असून साधू संताचे आशीर्वाद घेत ही यात्रा पुढे सरकत आहे. तिची पदयात्रा चित्रकूटहून बागेश्वर धामकडे कूच करत आहे. खरं तर तिने लग्नाबाबत उघडपणे काहीही भाष्य केले नसले तरी तिच्या बोलण्याचा सार असाच आहे. "मी १६ तारखेची वाट पाहत आहे. तसेच मी धीरेंद्र शास्त्री यांना माझा प्राणनाथ म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी बागेश्वर धामला जात आहे", असं शिवरंजनीने सांगितले.
शिवरंजनीची पदयात्रा
शिवरंजनीच्या म्हणण्यानुसार, ती येत्या १६ जूनला धीरेंद्र शास्त्री यांना भेटून मनातली गोष्ट सांगणार आहे. संतोषी आखाड्याचे महंत श्री रामजीदास महाराज यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, "विवाह हा एक विधी आहे, मात्र शिवरंजनी तिवारी ही इच्छा घेऊन पदयात्रा काढत असेल तर चित्रकूटच्या संतांचा पूर्ण आशीर्वाद तिला असेल." शिवरंजनी तिवारीचे वडील, भाऊ आदींचाही या पदयात्रेत सहभाग आहे.