शिवोली पुलावर वारंवार काळोखाच

By admin | Published: December 3, 2015 03:26 AM2015-12-03T03:26:19+5:302015-12-03T03:26:19+5:30

े शिवोली पुलावर वारंवार काळोखाचे साम्राज्य बार्देस : नुकत्याच काही वर्षापूर्वी शिवोली-चोपडे शापोरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर गेल्या वर्षभरापासून पुलावर असलेल्या विजेत्या खांबावरील दिवे पेटत नसल्याने या पुलावर काळोख पसरतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरून अनेक वाहने ये जा करत असतात. त्याबरोबर पादचारीही ये जा करत असतात. त्यांना या काळोखामुळे त्रास होतो. मोरजी, हरमल, केरी, पेडणे, मांद्रे, पार्से व महाराष्ट्रातूनही वाहन चालक आपली वाहने या पुलावरून घेऊन गोव्यात प्रवेश करतात. त्याचबरोबर पुन्हा परतीच्या वाटेवर जात असतात; पण गेल्या वर्षभरापासून या पुलावरील असलेल्या विजेच्या खांबावरचे दिवे अधून मधून पेटतात तर अनेकवेळा या पुलावर संपूर्ण काळोखच पसरलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून जाणार्‍या आणि येणार्‍या वाहन चालकांना त्रास होतो. तसेच चोपडे व शिवोली भागातील लोक य्

Shivholi bridge is often dated on the occasion of darkness | शिवोली पुलावर वारंवार काळोखाच

शिवोली पुलावर वारंवार काळोखाच

Next
शिवोली पुलावर वारंवार काळोखाचे साम्राज्य बार्देस : नुकत्याच काही वर्षापूर्वी शिवोली-चोपडे शापोरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर गेल्या वर्षभरापासून पुलावर असलेल्या विजेत्या खांबावरील दिवे पेटत नसल्याने या पुलावर काळोख पसरतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरून अनेक वाहने ये जा करत असतात. त्याबरोबर पादचारीही ये जा करत असतात. त्यांना या काळोखामुळे त्रास होतो. मोरजी, हरमल, केरी, पेडणे, मांद्रे, पार्से व महाराष्ट्रातूनही वाहन चालक आपली वाहने या पुलावरून घेऊन गोव्यात प्रवेश करतात. त्याचबरोबर पुन्हा परतीच्या वाटेवर जात असतात; पण गेल्या वर्षभरापासून या पुलावरील असलेल्या विजेच्या खांबावरचे दिवे अधून मधून पेटतात तर अनेकवेळा या पुलावर संपूर्ण काळोखच पसरलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून जाणार्‍या आणि येणार्‍या वाहन चालकांना त्रास होतो. तसेच चोपडे व शिवोली भागातील लोक या पुलावरून पायी चालत जातात. त्यांनाही या पुलावर काळोख असल्याने चालत जाणे मुश्कील झालेले आहे. या पुलावर वारंवार होत असलेल्या अशा या अंधाराच्या साम्राज्यामुळे वीज खात्याचे अक्षरश: दुर्लक्ष झाल्याचे वाहन चालक व येथील रहिवाशाकडून सांगितले जाते. वीज खात्याने या ठिकाणी लाईमनना पाठवून किंवा एखाद्या अभियंत्याने पूर्णत: पाहणी करून येथील विजेचा होत असलेली समस्या दूर करावी अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shivholi bridge is often dated on the occasion of darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.