पुतण्याविरोधात काका! शिवपाल यादव यांनी केली समाजवादी सेक्युलर मोर्चाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 01:20 PM2018-08-29T13:20:16+5:302018-08-29T13:21:01+5:30
मुलायम सिंह यादव कुटुंबीयांमधील संघर्ष तीव्र झाला असून, बऱ्याच काळापासून समाजवादी पक्षात बाजूला पडलेले समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी
लखनौ - मुलायम सिंह यादव कुटुंबीयांमधील संघर्ष तीव्र झाला असून, बऱ्याच काळापासून समाजवादी पक्षात बाजूला पडलेले समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाने पक्ष स्थापन केला आहे. समाजवादी पक्षातील उपेक्षित लोकांना या पक्षाशी जोडण्याचे काम करणार असल्याचे शिवपाल यादव यांनी सांगितले आहे. तसेच समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव हे सुद्धा या पक्षात दाखल होतील, दावा शिवपाल यादव यांनी केला आहे.
I have constituted Samajwadi Secular Morcha. All those who who are not being respected in Samajwadi Party should come with us. We will also bring together other smaller parties: Shivpal Yadav pic.twitter.com/eVrRgqaTRX
— ANI UP (@ANINewsUP) August 29, 2018
मुलायम सिंह यादव यांना सन्मान मिळत नसल्याने आपण दुखावले गेल्याचे शिवपाय यादव यांनी म्हटले आहे. वाट पाहता पाहता दीड वर्ष उलटून गेले आहे. शेवटी उपेक्षा तरी किती सहन करायची? सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात, असे शिवपाल यादव यांनी रक्षाबंधना दिवशी बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर म्हटले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या भारतीय सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी) चे अध्यक्ष आणि योगी सरकारमध्ये मंत्री असलेले ओम प्रकाश राजभर यांनी मंगळवारी शिवपाल यादव यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यामुळे शिवपाल यादव हे सुद्धा या पक्षात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर शिवपाल यादव मुलायम सिंह यांची भेट घेण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.