अरेरे! "आश्वासनं दिली, मदत मिळाली नाही"; भाजपा नेत्यावर आली रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 11:07 IST2023-06-17T10:58:17+5:302023-06-17T11:07:05+5:30
भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांशी चर्चा करून मदतीचे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले, मात्र आजतागायत प्रत्यक्षरितया कोणतीही मदत मिळालेली नाही.

अरेरे! "आश्वासनं दिली, मदत मिळाली नाही"; भाजपा नेत्यावर आली रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ
निवडणुका येताच राजकारणात अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात. अशीच एक अनोखी घटना नरवर शहरात समोर आली आहे. जिथे भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चा मंडळाच्या उपाध्यक्षांनी आता भाजी विकायला सुरुवात केली आहे. यासाठी उपाध्यक्षांनी भाजपालाच जबाबदार धरले आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील नरवर तहसीलमध्ये राहणारे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे मंडळ उपाध्यक्ष समीर कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते तीन वर्षांपासून सातत्याने भाजपासाठी काम करत आहेत. सलग तीन वर्षे भाजपा समर्पित आहे आणि भाजपामध्ये राहून आपली सेवा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या आईला पॅरेलिसिसचा त्रास आहे, अशा परिस्थितीत त्यांनी याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अनेकदा माहिती दिली, मात्र त्यांनी कोणतीही मदत केली नाही. यामुळे ते भाजपावर नाराज आहेत. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांशी चर्चा करून मदतीचे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले, मात्र आजतागायत प्रत्यक्षरितया कोणतीही मदत मिळालेली नाही.
आईला पॅरेलिसिसचा त्रास आहे आणि अशा परिस्थितीत ते स्वतःच्या आईवर उपचारसाठी खर्च करू शकत नाही. अनेकवेळा ते नेत्यांसह भोपाळपर्यंत गेले आणि आश्वासने मिळवली. पण तरीही मदत नाही. त्यामुळेच त्यांनी आता भाजी विकायला सुरुवात केली आहे, पैसे जमा करून आईवर उपचार करेन असं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.