शिवराज यांनी पिंडदान योजना सुरू करावी - दिग्विजय सिंह

By admin | Published: July 9, 2015 09:20 AM2015-07-09T09:20:19+5:302015-07-09T11:36:50+5:30

शिवराज सिंग चौहान यांनी पिंडदान योजना सुरू करावी अशी खोचक टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्राच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

Shivraj should launch Pindda scheme - Digvijay Singh | शिवराज यांनी पिंडदान योजना सुरू करावी - दिग्विजय सिंह

शिवराज यांनी पिंडदान योजना सुरू करावी - दिग्विजय सिंह

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ९ - मध्य प्रदेशमधील बहुचर्चित व्यापम घोटळ्यावरून देशात वातावरण तापलेले असताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'शिवराज यांनी पिंडदान योजना सुरू करावी' अशी खोचक टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे. 
' व्यापम घोटाळा प्रकरणात एकामागोमाग होणारे मृत्यू पाहता मामांनी (शिवराज यांना राज्यात या नावाने संबोधले जाते) कन्यादान योजनेसोबत 'पिंडदान' योजनाही सुरू करायला हवी' असे ट्विट दिग्विजय यांनी केले आहे.
दरम्यान अनेक गूढ मृत्यूंनी व्यापलेल्या या घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या घोटाळ्याशी संबंधित बळींची संख्या ५० वर पोहोचली असून, गेल्या आठवडाभरात पाच जणांच्या गूढ मृत्यूमुळे जनमानस ढवळून निघाले आहे

Web Title: Shivraj should launch Pindda scheme - Digvijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.