'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 02:42 PM2018-12-12T14:42:49+5:302018-12-12T14:50:29+5:30
शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे.
भोपाळ - शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, ही बाब त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
'अब मैं आजाद हूँ', अशी प्रतिक्रिया चौहान यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ''भाजपा कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. पराभवाची जबाबदारी पूर्णतः माझी आहे'', असेही त्यांनी म्हटलं.
'ना हार में, ना जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिले, ये भी सही वह भी सही।', पत्रकारांसोबत बोलताना चौहान यांनी ही कविताही बोलून दाखवली.
Bhopal: Shivraj Singh Chouhan tenders his resignation to the Governor Anandiben Patel, earlier today #MadhyaPradeshElections2018pic.twitter.com/3MKTBDqc21
— ANI (@ANI) December 12, 2018
मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे.
बहुमत नाही, मग सत्ताही नको; शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा, काँग्रेसचा मार्ग मोकळा https://t.co/tCh3A1CpWz #MadhyaPradeshElections2018#shivrajsinghchouhan
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 12, 2018
दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी 12 वाजता काँग्रेसला भेटण्यास बोलावलं होते. यानुसार, काँग्रेस शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेसकडून शिष्टमंडळात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा यांचा समावेश आहे.
Madhya Pradesh: Congress delegation met Governor Anandiben Patel to stake claim to form the government, earlier today. #AssemblyResults2018pic.twitter.com/DKqMaRd7bP
— ANI (@ANI) December 12, 2018
भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद https://t.co/Zw8rYFiwPH#AssemblyResults2018@RahulGandhi
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 12, 2018
Shivraj Singh Chouhan: Ab mein mukt hoon, I am free. I have tendered my resignation to the honourable Governor. The responsibility of defeat is totally mine. I have congratulated Kamal Nath ji pic.twitter.com/Zuek1cSGGa
— ANI (@ANI) December 12, 2018
Shivraj Singh Chouhan: Na haar mein, na jeet mein, kinchit nahin bhaybhit main, kartavya path par jo bhi mile, yeh bhi sahi woh bhi sahi https://t.co/8a1VR4T5wP
— ANI (@ANI) December 12, 2018