शिवरायांचे व्यक्तीमत्व मोठेच मनमोहन वैद्य: रा.स्व.संघ चिंतन बैठकीस प्रारंभ

By admin | Published: January 5, 2016 11:40 PM2016-01-05T23:40:21+5:302016-01-05T23:40:21+5:30

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे निर्विवाद महान आहे. केवळ संघ विचारांना विरोध करणारी काही मंडळी अपप्रचार करत असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली.

Shivrajaya's personality started in large number of Manmohan Vaidya: RSS Communication Conference | शिवरायांचे व्यक्तीमत्व मोठेच मनमोहन वैद्य: रा.स्व.संघ चिंतन बैठकीस प्रारंभ

शिवरायांचे व्यक्तीमत्व मोठेच मनमोहन वैद्य: रा.स्व.संघ चिंतन बैठकीस प्रारंभ

Next
गाव : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे निर्विवाद महान आहे. केवळ संघ विचारांना विरोध करणारी काही मंडळी अपप्रचार करत असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या चिंतन बैठकीस मंगळवारी जळगावात प्रारंभ झाला. रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह नऊ प्रतिनिधी पहिल्या दिवशी या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. अखिल भारतीय स्तरावरील पूर्णवेळ प्रचारक असलेले अन्य प्रतिनिधी बुधवारी सकाळी जळगावात येथील. या बैठकीसंदर्भात वैद्य यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
देशभरात प्रतिसाद वाढतोय
पुणे येथे पि›म महाराष्ट्राचा शिवशक्ती संगम झाला. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद देतानाच्या प्रमिमेवरून निर्माण झालेल्या वादाबाबत विचारणा केली असताना वैद्य म्हणाले, शिवरायांचे व्यक्तीमत्व हे निर्विवाद महान आहे.

प्रचारकांची बैठक
जळगावनजीक असलेल्या कुसुंबा येथील चिंतन बैठकीसाठी पहिल्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह भैया जोशी, सह सरकार्यवाह दत्तात्रय होजबाळे, डॉ. कृष्णगोपाल, भागैयाजी, सेवा प्रमुख सुहासराव हिरेमठ, कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी, प्रचार प्रमुख मोहन वैद्य,अ.भा. प्रचार प्रमुख सुरेशचंद्र आदी नऊ जण दाखल झाले आहेत. अ.भा. कार्यकारिणी सदस्य इंद्रेशजी व अन्य प्रचारक बुधवारी दाखल होणार असून त्यांच्या उपस्थिती प्रमुख बैठकीस प्रारंभ होईल.
-----
चितंन बैठकीचा उद्देश
मार्च मध्ये होणार्‍या अखिल भारतीय बैठकीच्या कार्यक्रमाचे नियोजन, देशभरातील प्रचारकांचे विविध ठिकाणच्या भेटीतील अनुभव कथन असा चिंतन बैठकीचा उद्देश आहे. अनौपचारीक स्वरूपाच्या या बैठकीत कोणतेही ठराव वा सत्र नसतील असेही वैद्य यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वानंद झारे, शहर कार्यवाह हितेश पवार, विभाकर कुरंभ˜ी आदी उपस्थित होते.

Web Title: Shivrajaya's personality started in large number of Manmohan Vaidya: RSS Communication Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.