...तर इतर रेजिमेंटचे जवान सीमेवर तंबाखू मळत होते का?; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनेचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:22 PM2020-06-26T14:22:02+5:302020-06-26T14:32:28+5:30
पंतप्रधान मोदींनी बिहार रेजिमेंटचे कोतुक केल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाष्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जबरदस्त हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चकमकीनंतर, बिहार रेजिमेंटची प्रशंसा केली होती. यावर संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया देत, 'त्या' जवानांनी शौर्य दाखवले, तर इतर रेजिमेंटचे जवान काय सीमेवर तंबाखू मळत होते का?' असा सवाल केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'बिहार रेजिमेंट’ने लडाखच्या गलवान खोऱ्यात शौर्य दाखवले. तर मग, महार, मराठा, राजपूत, शिख, गोरखा आणि डोगरा रेजिमेंट सीमेवर तंबाखू मळत बसल्या होत्या का? महाराष्ट्राचा वीर पुत्र सुनील काळे यांना काल पुलवामामध्ये वीरमरण आले. मात्र, बिहारमध्ये निवडणुका असल्याने लष्करात ‘जात’ आणि ‘प्रांत’ यांचे महत्व सांगितले जात आहे. अशा प्रकारचे राजकारण कोरोनापेक्षाही घातक आहे!, असे संजय राऊत म्हणाले.
'प्रत्येक रेजिमेंट देशाची' -
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला, पंतप्रधान मोदींनी बिहार रेजिमेंटचे कोतुक केल्यावरून त्यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, लष्कराची कोणतीही रेजिमेंट केवळ रेजिमेंटच असते. प्रत्येक रेजिमेंटची आपली एक परंपरा आणि गाथा आहे. सर्व रेजिमेंट देशाच्या असतात. त्या कुण्या एका प्रांत, राज्य अथवा धर्माच्या नसतात.
निवडणुकीमुळे घेतले गेले नाव -
राऊत म्हणाले, राजपूताना रेजिमेंट, शिख रेजिमेंट, महार रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, गोरखा आणि डोगरा रेजिमेंट आहेत. परंपरेनुसार या रेजिमेंट्सचे नाव असते. केवळ एकाच रेजिमेंटचे नाव घेणे, एका राज्याचे नाव घेणे, हे राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मतेसाठी योग्य नाही. केवळ बिहारमध्ये निवडणुका आहेत, म्हणून बिहारचे नाव घेतले जात आहे. गलवान खोऱ्यात संपूर्ण देशाचे जवान आहेत. ज्यांना हौतात्म्य येते, ते देशाचे जवान आहेत. राष्ट्राची आत्मा आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'
चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'
फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट