शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 05:07 PM2020-07-23T17:07:37+5:302020-07-23T17:13:17+5:30

उदयराजेंनी दिलेल्या घोषणांना उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतल्यानं नवा वाद; महाविकासआघाडीकडून भाजपा लक्ष्य

shivsena Mp Sanjay Raut Gives Clean Chit To Venkaiah Naidu Over Jai Bhavani Jai Shivaji Row in rajya sabha | शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

Next

मुंबई: 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात घेतलेल्या आक्षेपावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लीन चिट दिली आहे. 'व्यंकय्या नायडू हे सभागृहाच्या नियमानुसार वागले, पण छत्रपती शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. त्या आम्ही मांडत आहोत, असं राऊत म्हणाले. 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं.

राज्यसभेत काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. ही घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी भाजपावर तोफ डागली आहे. मतांसाठी शिवराय चालतात. मग त्यांच्या नावाच्या घोषणा का चालत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्ला चढवला. 'भाजपचं तोंड बंद का? संभाजी भिडे यांनी आता सांगली, सातारा बंदची हाक का दिली नाही?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर खुद्द उदयनराजे यांनी सगळ्या वादावर खुलासा केला. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही. शरद पवारही तिथं होते. त्यामुळं कुणीही राजकारण करू नये,' असं आवाहन त्यांनी केलं.

उदयनराजे भोसले यांच्या खुलाशानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यंकय्या नायडू नियमानं वागल्याचं म्हटलं. नायडू उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. नियमांचं काटेकोर पालन करणारे आहेत. त्यांच्या दृष्टीनं म्हणाल, तर ते बरोबर आहेत. संसदीय लोकशाही व कामकाजाचे कायदे यांची त्यांना जाण आहे. आम्ही सगळे त्यांचं ऐकतो. त्यांचा आदर करतो. पण शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. नियम आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'जय भवानी आणि जय शिवाजी' ही घोषणा नियमबाह्य घटनाबाह्य नाही. ती असू नये, असं आमचं म्हणणं आहे. 'जय हिंद आणि वंदे मातरम्' इतकीच ती महत्त्वाची आहे,' असं राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट

"मला छत्रपती शिवरायांबद्दल आदर अन् मी आई भवानीचा उपासक" - व्यंकय्या नायडू

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

Read in English

Web Title: shivsena Mp Sanjay Raut Gives Clean Chit To Venkaiah Naidu Over Jai Bhavani Jai Shivaji Row in rajya sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.