संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 10:27 AM2022-12-23T10:27:47+5:302022-12-23T10:28:18+5:30

बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल खटला दाखल करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Shivsena Sanjay Raut target BJP and Eknath Shinde over Maharashtra Karnatak Border Dispute | संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण...

संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण...

googlenewsNext

नवी दिल्ली - चीनच्या राष्ट्रपतींना अहमदाबादमध्ये बोलावून झोपाळ्यावर झुले देऊन सन्मान करणाऱ्यांना काय म्हणणार? चीनने जगभरात घुसखोरी केली. त्यात भारतातही घुसखोरी केलीय. त्याच पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सांगली, कोल्हापूरात करतेय. बेसावध ठेऊन तुम्ही असे करणार असाल तर आम्हालाही तोच मार्ग अवलंबवावा लागेल. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतून आग लावण्याचं काम बोम्मई करतायेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ते जे काही बोलले तेच बोम्मई मानायला तयार नाहीत. ते आमची संस्कृती काढतायेत. आम्हाला त्यांनी संस्कृती, संस्कार, भाषा शिकवण्याची गरज नाही. बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तोंडं बंद आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी कडाडून भाजपा-शिंदे सरकारचा समाचार घेतला. 

संजय राऊत म्हणाले की, विधानसभेत सगळ्या विषयांवर गोंधळ झाला, अनावश्यक विषय काढले गेले. व्यक्तिगत विषयांवर बोलत होते. कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला त्याची माहिती सरकारला नसावी हे दुर्दैवी आहे. आम्हाला कर्नाटकची जमीन नको. आमची हक्काची गावे बेळगाव, कारवार, निपाणी मागतोय. आम्ही कायद्याच्या भाषेत बोलतोय. फायद्याच्या भाषेत नाही जे बोम्मई बोलतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार या विषयावर तोंड बंद करून बसलंय हे राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचे दुर्दैव आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक वाद नाही. हा वाद राजकीय फायद्यासाठी बोम्मई यांनी बाहेर काढला. आम्ही चीनचे एजेंट असाल तर तुम्ही कुणाचे एजेंट आहात? देशाच्या गृहमंत्र्यांसमोर जी गोष्ट मान्य केली ती मानायला तुम्ही तयार नाही. आम्हालाही घटनेने अधिकार दिलाय. महाराष्ट्रातील आमच्या गावांवर हक्क सांगता त्याला विरोध करण्याचा अधिकार आम्हाला आहे. महाराष्ट्र सरकारनंही अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात आणि बोम्मई यांच्यावर ठराव आहे. बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल खटला दाखल करा. २० लाख सीमावासियांना तुम्ही गुन्हेगार ठरवाल. बोम्मई यांच्यावर खटला दाखल करा. ज्याप्रकारे महाराष्ट्राविरोधात भाषेचा वापर केला तो आजतागायत कुठल्या सरकारने केला नाही. महाराष्ट्रात दुर्बळ सरकार बसलंय. आमची भाषा घुसण्याची आहे पण सरकारमध्ये हिंमत आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी राज्य सरकारला विचारला.  
 

Web Title: Shivsena Sanjay Raut target BJP and Eknath Shinde over Maharashtra Karnatak Border Dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.