उड्डाणपुलाला मृणालताईंचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी
By Admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:36+5:302015-09-04T22:45:36+5:30
उड्डाणपुलाला मृणालताईंचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी
उ ्डाणपुलाला मृणालताईंचे नाव देण्याची शिवसेनेची मागणीगोरेगाव: गोरेगाव हा एकेकाळचा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. शिवसेना आणि समाजवादी यांचेही विळ्या भोपळ्याचे नाते होते. कालांतराने राजकीय मतभेद तेवढे तीव्र राहिले नाहीत. त्याचेच चित्र सध्या गोरेगावात दिसून येत आहे. गोरेगावच्या रहिवासी आणि पाणीवाली बाई म्हणून लोकप्रिय असलेल्या मृणालताई गोरे यांचे नाव गोरेगाव पूर्व आणि पिम उड्डाणपुलाला देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेकडून आमदार सुनील प्रभू यांनी ही मागणी पत्राद्वारे स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगर) दीपक भूतकर यांच्याकडे केली आहे. हब मॉल लगत असलेला या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून दोन महिन्यांत या पुलाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. या पुलाच्या लोकार्पणावेळी उड्डाणपुलाला मृणाल गोरे यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सामाजिक राजकीय चळवळीतील अग्रगण्य नेत्या, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेतेपद भूषवलेल्या मृणालताईंची स्मृती चिरंतन राहावी, म्हणून या उड्डाणपुलास त्यांचे नाव द्यावे, अशी समस्त नागरिकांची इच्छा असल्याचे प्रभू यांनी पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी).........................................................