शिवोली बंदला संमिर्श प्रतिसाद
By Admin | Published: September 3, 2015 12:17 AM2015-09-03T00:17:41+5:302015-09-03T00:17:41+5:30
कामुर्ली : शिवोली परिसरात बंदला संमिर्श प्रतिसाद लाभला. या परिसरातील खासगी गाड्या बंद होत्या. पेडणे तालुक्यातून शिवोली मार्गे म्हापसा-पणजीपर्यंत जाणार्या खासगी गाड्या बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तार-शिवोली बाजारात बहुतांशी दुकाने चालू होती.
क मुर्ली : शिवोली परिसरात बंदला संमिर्श प्रतिसाद लाभला. या परिसरातील खासगी गाड्या बंद होत्या. पेडणे तालुक्यातून शिवोली मार्गे म्हापसा-पणजीपर्यंत जाणार्या खासगी गाड्या बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तार-शिवोली बाजारात बहुतांशी दुकाने चालू होती. शिवोली येथील मासळी बाजारही चालू होता. मासळी बाजारात थोड्याफार कमी प्रमाणात रेलचेल दिसून आली. तसेच थिएटर परिसरातही बंदचा संमिर्श परिणाम जाणवला. चर्च परिसरातही काही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. शिवाय गॅस एजन्सी बंद होती. शिवोली परिसरातील बँकांचे व्यवहार सुरळीत होते. पोलीसांचा कडक बंदोबस्त होता. शिवोली येथील कीर्ती विद्यालय व एसएफएक्स स्कूलमध्येही बंदचा कोणताही परिणाम झाला नाही. वसंत विद्यालयात विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरज चोडणकर यंनी दिली. कोरगाव तसेच पर्वरी येथून येणार्या शिक्षकांना शाळेत येण्यास कोणताही त्रास झाला नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी बालरथाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी गैरहजर असण्याचे प्रमाण अत्यल्प होते. असा दावा मुख्याद्यापकांनी केला. सडये येथील शांता विद्यालयावरही बंदचा परिणाम झाला नसल्याचा दावा मुख्याध्यापक शशिकांत नाईक यांनी केला. सडये परिसरातील काही दुकाने बंद ठेवण्यात आल्याची माहिती पंचायत कार्यालयातील शिपायाने दूरध्वनीवरून दिली. शिवोली परिसरात कोणताही अनुचीत प्रकार झाला नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई यांनी दिली. कामुर्लीतही बंदला प्रतिसाद.. कामुर्लीतही बंदला संमिर्श प्रतिसाद लाभला. खैराट, वागाळी-कामुर्लीमार्गे म्हापसाला जाणार्या खासगी गाड्या बंद होत्या. कदंब सेवा चालू होती. त्यामुळे कदंब वाहनांवर ताण आल्याचे दिसून येत होते. शाळा सुरू होत्या. पिपल्स हायस्कूलचे वर्ग चालू होते; पण मुलांना सकाळी लवकर सोडण्यात आले. बालरथ उपलब्ध न केल्यामुळे शाळेतील मुलांना घरी पायी जावे लागले. तार येथील दुकाने चालू होती. रेती वाहतुकीवर परिणाम झाला. खैराट परिसरातही सर्व व्यवहार सुरळीत होते. (प्रतिनिधी)फोटो : शिवोलीत बाजारात सुरळीत चालू असलेले व्यवहार. (जयेश नाईक) 0209-एमएपी-06