शोभा डे पुन्हा बरळल्या, सुषमा स्वराज यांना दिला सल्ला
By admin | Published: January 13, 2017 09:52 PM2017-01-13T21:52:57+5:302017-01-13T22:22:29+5:30
नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या विषयावरुन ट्विटरवर वादग्रस्त ट्विट करणा-या स्तंभलेखिका शोभा डे पुन्हा एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या विषयावरुन ट्विटरवर वादग्रस्त ट्विट करणा-या स्तंभलेखिका शोभा डे पुन्हा एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.
शोभा डे यांनी चक्क ट्विट करुन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सल्ला दिला आहे. त्यामध्ये सुषमा स्वराज यांना नवीन वर्षात शांत बसण्याचा आणि ट्विट करणे थांबविण्याचा संकल्प करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, शोभा डे यांनी केलेल्या ट्विटला अनेक नेटिझन्सनी नाराजीचा सूर उमटविला असून यावर उलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Sushma Swaraj : Resolution for 2017 - Keep calm and stop tweeting.
— Shobhaa De (@DeShobhaa) 13 January 2017
अॅमेझॉनकडून कॅनडात तिरंगा ध्वजाच्या रंगरूपातील पायपुसण्याची विक्री करण्यात येत होती. ही माहिती कळाल्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून अॅमेझॉनला कडक शब्दांत समज दिली होती. यामध्ये त्यांनी उत्पादनाची विक्री ताबडतोब थांबविण्यात यावी, तसेच बिनशर्त माफी मागण्यात यावी, अन्यथा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा व्हिसा दिला जाणार नाही. याआधी देण्यात आलेला व्हिसाही रद्द करण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानंतरअॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री थांबविली आहे.
@DeShobhaa I really dont understand why u have problem with Shushma Swaraj? Let her express share support talk help anyone and anybody
— Mayurii_Shetty
@DeShobhaa actually this resolution should be yours
— Shalini Gupta (@shalini8282) 13 January 2017
दरम्यान, शोभा डे यांनी याआधीही अनेक वादग्रस्त ट्विट करुन वाद ओढवून घेतला होता.