धक्कादायक! दिल्लीत एकाच घरात सापडले 11 मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 09:16 AM2018-07-01T09:16:14+5:302018-07-01T10:30:19+5:30
उत्तर दिल्लीतल्या बुरारी भागात एका घरात लटकलेल्या अवस्थेत 11 मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली- उत्तर दिल्लीतल्या बुरारी भागात एका घरात 11 मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन कुटुंबातील 11 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे प्रकरण आत्महत्येचं आहे की सामूहिक हत्येचं याचा पोलीस तपास करत आहेत.
अद्यापही या 11 जणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं आत्महत्या करण्याचं कारण काय असेल, याचाही पोलीस शोध घेत आहेत. नवी दिल्लीतल्या संतनगरमधल्या गुरुगोविंद सिंह रुग्णालयासमोरच्या गल्ली नंबर 2मध्ये ही घटना घडली आहे. मृतांपैकी 10 जणांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. तसेच 10 मृतदेह रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडलेत. तर एक मृतदेह जमिनीवर सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काहींचे हात बांधण्यात आले होते, तर काहीचे पाय बांधण्यात आले होते. तर काहींच्या तोंडावर पट्टीदेखील बांधली होती. बुरारीच्या ज्या परिसरात हे मृतदेह सापडले आहेत, तिथे लोकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळीच अशा प्रकारची घटना समोर आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही दोन भावांच्या कुटुंबातील असून, मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील एक जण प्लायवुडचा धंदा करत होता, तर दुस-याचं किराणा मालाचं दुकान होतं.
#LatestVisuals from Delhi's Burari where bodies of 7 women and 4 men have been found at a house; Police present at the spot, investigation on. pic.twitter.com/2MukQxi8az
— ANI (@ANI) July 1, 2018
#Visuals from Delhi's Burari where bodies of 7 women and 4 men have been found at a house; Police present at the spot, investigation on. pic.twitter.com/CjuReQbaXT
— ANI (@ANI) July 1, 2018
Bodies of 7 women and 4 men found at a house in #Delhi's Burari; Police present at the spot, investigation on.
— ANI (@ANI) July 1, 2018