धक्कादायक! विष प्रयोगाने तब्बल 23 मोरांचा मृत्यू, शेतकऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 05:31 PM2019-12-24T17:31:54+5:302019-12-24T17:32:51+5:30
मोरांचे मृतदेह वन विभागाच्या ताब्यात
जयपूर : राज्यस्थानमध्ये 23 मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बिकानेरमध्ये असलेल्या सेरुना गावात ही घटना घडली असून एका शेतकऱ्याने पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या मोरांवर विष प्रयोग केल्याचे उघडकीस आले आहे.
वन विभागाचे सहायक वनसंरक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेरुना गावात दिनेश कुमार या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मोरांवर विष प्रयोग केला. याप्रकरणी दिनेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. तसेच, 23 मोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
Rajasthan: 23 peacocks dead allegedly after a farmer poisoned them to prevent crop damage, in Seruna village in Bikaner. Assistant Conservator of Forests, Forest Department says,"Carcass of 23 peacocks recovered. Farmer Dinesh Kumar has been arrested." pic.twitter.com/ZIjhrIvfNK
— ANI (@ANI) December 24, 2019
दरम्यान, याआधी 2013 साली राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात अशाच प्रकारे मोरांना विष देऊन मारण्यात आले होते.