धक्कादायक! फळांच्या ज्युसमध्ये लघवी मिसळून विकत होता दुकानदार, २ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:13 AM2024-09-14T11:13:42+5:302024-09-14T11:13:56+5:30
Uttar Pradesh Crime News: एका ज्युसच्या दुकानामधील ज्युसमधून ग्राहकांना लघवी पाजली जात असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक लोकांना ज्युसमधून विचित्र वास येत असल्याने शंका आली. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या मालकाला रंगेहात पसरले आणि त्याला मारहाण केली.
खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा अस्वच्छता असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. मात्र आता गाझियाबादमधील लोणी क्षेत्रामधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. इंदिरापुरी परिसरातील एका ज्युसच्या दुकानामधील ज्युसमधून ग्राहकांना लघवी पाजली जात असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक लोकांना ज्युसमधून विचित्र वास येत असल्याने शंका आली. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या मालकाला रंगेहात पसरले आणि त्याला मारहाण केली.
दुकानामध्ये ठेवलेल्या एका बाटली लघवी भरल्याचे आढळून आले. स्थानिकांनी याचा व्हिडीओ तयार करून त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. संतप्त लोकांनी सदर तरुणाची पिटाई केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दुकानाच्या संचालकासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच ज्युसचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
गाझियाबाद जिल्ह्यामधील लोनी बॉर्डर क्षेत्रात पोलिसांनी एका २९ वर्षीय ज्युस विक्रेत्याला कथितपणे फळांच्या ज्युसमध्ये लघवी मिसळून विक्री केल्या प्रकरणी अटक केली आहे. तसेच त्याच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन सहकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सदर ज्युसविक्रेता हा ज्युसमध्ये लघवी मिसळून ती ग्राहकांना पाजत असे. ज्युसविक्रेत्याचं नाव आमिर (२९) असल्याचं समोर आलं आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारीनंतर त्याच्या दुकानाची तपासणी केली असता तिथे लघवीने भरलेलं प्लॅस्टिकचं कॅन सापडले, आरोपीकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता तो समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.