धक्कादायक ! ICU मध्ये तरुणीवर जबरदस्ती, ऑक्सिजन मास्क लावलं असतानाही करण्यात आले अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 10:48 AM2017-11-29T10:48:23+5:302017-11-29T11:49:25+5:30
महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे एका खासगी रुग्णालयातील दोन कर्मचा-यांनी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेची 16 वर्षीय मुलगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
गुरुग्राम - महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे एका खासगी रुग्णालयातील दोन कर्मचा-यांनी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेची 16 वर्षीय तरुणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. जेव्हा तरुणीने विरोध केला तेव्हा आरोपींमधील एका कर्मचा-याने ऑक्सिजन सपोर्ट काढून टाकण्याची धमकीही दिली असल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.
पीडित तरुणीच्या आईने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पुरुष कर्मचा-यांनी त्यांच्या मुलीवर जबरदस्ती करत स्पर्श करण्याचा तसंच 16 नोव्हेंबरला बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने सॉफ्ट ड्रिंक समजून चुकून कीटकनाशक मारण्याचं औषध प्यायलं होतं. यानंतर तिला राजीव नगरमधील शिवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अत्याचार झाले असतानाही मानसिक धक्का बसला असल्या कारणाने पीडित तरुणीने कोणाकडेही यासंबंधी भाष्य केलं नव्हतं. पण जेव्हा आरोपी तिला वारंवार फोन करुन सतावू लागले तेव्हा मात्र तिने आपल्या आईला सर्व सांगितलं. तिच्या आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपी कर्मचा-यांना अटक करुन न्यायालयात हजर केलं. दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनाने आपण दोन्ही कर्मचा-यांना निलंबित केलं असल्याचं सांगितलं आहे. पोलिसही रुग्णालय प्रशासनावर नजर ठेवून आहेत.
तरुणीला 16 नोव्हेंबर रोजी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिच्या आईने तिला शिवा रुग्णालयात नेलं, जिथे तिला आयसीयूत ठेवण्यात आलं. रात्री उशिरा जेव्हा तरुणीचे वडिल घरी परतले तेव्हा रविंदर आणि कुलदीप या दोन नर्सिंग कर्मचा-यांनी तरुणीवर हल्ला केला. कुलदीपने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, आणि जेव्हा तिने विरोध केला तेव्हा ऑक्सिजन सपोर्ट काढण्याची धमकी दिली. तरुणीने आरडाओरड करुन मदत मागण्याचा प्रयत्न केला असताना रविंदरने तिचं तोंड दाबलं आणि कुलदीपने बेशुद्धीचं औषध दिलं.
आणखी वाचा: कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण- तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा
कुलदीपने पुन्हा एकदा त्याच रात्री पुन्हा एकदा तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीचा टॉप काढून तिला किस करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत रेस्टरुममध्ये येण्याची धमकीही त्याने दिली. तरुणी त्याच्यासोबत गेली असता, बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. तरुणी तिथे बेशुद्ध पडली. दुस-या दिवशी तरुणीला डिस्चार्ज देण्यात आला. घटनेनंतर तरुणीला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता, त्यामुळे तिने पालकांकडे भाष्यता केली नाही. यावेळी आरोपींनी तिला फोन करण्यास सुरुवात केली. अखेर 25 नोव्हेंबरला तरुणीने आईला घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 'हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. यामध्ये रुग्णालयाच्या भुमिकेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आहे. जर रुग्णालय खोटी माहिती देत असल्याचं समोर आलं, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.