धक्कादायक...केळी नामशेष होण्याच्या मार्गावर; कोलंबियामध्ये आपत्कालीन स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 03:38 PM2019-08-17T15:38:21+5:302019-08-17T15:39:29+5:30
अमेरिकेमध्ये फळांवर प्रक्रिया करून आयात केली जातात. एवढे प्रयत्न करूनही हा बॅक्टेरिया अमेरिकेतील केळ्यांच्या प्रजातींवर पसरला आहे.
नवी दिल्ली : पुढील काही वर्षांमध्ये लोकांचे सर्वात पसंतीचे फळ केळे जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संशोधकांनुसार एक धोकादायक चिती केळ्यांना जगातून गायब करू शकते. हा बॅक्टेरियानेआधीच एका केळ्याच्या प्रजातीला नष्ट केले आहे. आता तो नव्या प्रजातींकडे वळू लागला आहे.
अमेरिकेमध्ये फळांवर प्रक्रिया करून आयात केली जातात. एवढे प्रयत्न करूनही हा बॅक्टेरिया अमेरिकेतील केळ्यांच्या प्रजातींवर पसरला आहे. दक्षिण अमेरिकेतील देश कोलंबियामध्ये तर सरकारने राष्ट्रीय संकट जाहीर केले आहे.
कोलंबियातील ला गुआजिरामध्ये 180 हेक्टरच्या जमिनीमध्ये फ्यूजेरियम टाइप-4 (टीआर-4) प्रकाराची चिती आढळून आली आहे. संयुक्त राष्ट्राकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे. केळ्यांमध्ये पसरलेल्या या आजारावर रसायनांचाही प्रभाव पडत नाहीय. या बॅक्टेरियावर कोणत्याही प्रकारचे औषध प्रभावी ठरू शकलेले नाही. या प्रकारची चिती एकदा आल्यास पुढील 30 वर्षे जमिनीमध्ये जिवंत राहू शकते. या धोकादायक चितीवर औषधे शोधण्याचे काम सुरू आहे.
टीआर-4 नावाचा ही चिती पहिल्यांदा मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळली होती. यानंतर ती चीनमध्येही पसरली. ही चिती झाडाच्या मुळांवर हल्ला करते. झाडाच्या धमन्यांना ही चिती नष्ट करते. यामुळे झाड मरते. हा बॅक्टेरिया ऑफ्रिका, मध्य पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये 2013 मध्ये आढळला होता. आता तो अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक केळ्याचे उत्पादन होणाऱ्या भागात पसरला आहे.
कोलंबियन एग्रीकल्चर इंस्टीट्यूट (आइसीए) चे महाप्रबंधक डेयनिरा बैरेरो लियोन यांनी ट्विट करत सांगितले की, या बॅक्टेरियाशी लढण्यासाठी नेदरलैंड, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांना कामाला लावले आहे. याचबरोबर यासाठी पोलिस आणि सैन्याचीही मदत घेतली जाणार आहे.