धक्कादायक : अतिरेकी कारवायांत सक्रिय होणाऱ्या काश्मिरी तरुणांच्या संख्येत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:57 AM2018-06-11T04:57:28+5:302018-06-11T04:57:28+5:30

पाकिस्तानातून घुसखोरी करणाºया विदेशी अतिरेक्यांची संख्या गत पाच वर्षांत काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, अतिरेकी कारवायांत सक्रिय होणा-या काश्मिरी तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे सुरक्षा एजन्सींच्या आकडेवारीवरून दिसून येते.

 Shocking: The big increase in the number of Kashmiri youth active in terrorist activities | धक्कादायक : अतिरेकी कारवायांत सक्रिय होणाऱ्या काश्मिरी तरुणांच्या संख्येत मोठी वाढ

धक्कादायक : अतिरेकी कारवायांत सक्रिय होणाऱ्या काश्मिरी तरुणांच्या संख्येत मोठी वाढ

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानातून घुसखोरी करणाºया विदेशी अतिरेक्यांची संख्या गत पाच वर्षांत काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, अतिरेकी कारवायांत सक्रिय होणा-या काश्मिरी तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे सुरक्षा एजन्सींच्या आकडेवारीवरून दिसून येते. गृहमंत्री राजनाथ सिंह हे गत आठवड्यात जम्मू- काश्मीरच्या दौºयावर होते. या वेळी सुरक्षा एजन्सीने हा अहवाल त्यांना सादर केला.
यावर्षी काश्मीर खोºयात एप्रिलमध्ये २७६ सक्रीय अतिरेक्यांपैकी ५६ टक्के म्हणजे १५४ अतिरेकी हे स्थानिक तरुण होते. एप्रिल २०१७मध्ये २५१ अतिरेकी हे स्थानिक तरुण होते. याच महिन्यात २०१६मध्ये स्थानिक अतिरेक्यांचे प्रमाण ५४ टक्के होते. गृह मंत्रालयाच्या एका अहवालावरून दिसून येते की, यावर्षी ३० एप्रिलपर्यंत ५७ अतिरेकी एन्काउंटरमध्ये मारले गेले. यात ३७ स्थानिक पुरुष होते, तर २० विदेशी होते म्हणजे मुख्यत: पाकिस्तानी होते. २०१७मध्ये २१३ अतिरेकी ठार झाले. यात ८५ स्थानिक आणि १२८ विदेशी होते.
अतिरेक्यांच्या भरतीबाबत कट्टर विचारसरणीचे प्रमाण खूपच कमी होते. यातून असे दिसून आले आहे की, यापैकी फक्त २ टक्के अतिरेकी हे मदरशात शिक्षण घेतलेले होते, तर काही प्रकरणात या तरुणांना प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग झाला. जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात १५ जवान शहीद झाले, तर सुरक्षादलाचे २९ जवान २०१८मध्ये याच काळात शहीद झाले. २०१५ ते २०१७ या काळात २०१ जवान शहीद झाले. २०१२ ते २०१४ या काळात ११५ जवान शहीद झाले आहेत.

Web Title:  Shocking: The big increase in the number of Kashmiri youth active in terrorist activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.