धक्कादायक! चक्क महापौरांच्या मुलाने नगरसेविकेला मारला डोळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:02 PM2019-08-21T14:02:02+5:302019-08-21T14:02:35+5:30

नगरसेविकेने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे.

Shocking! bihar ward councilor accuses mayors son of eve teasing | धक्कादायक! चक्क महापौरांच्या मुलाने नगरसेविकेला मारला डोळा 

धक्कादायक! चक्क महापौरांच्या मुलाने नगरसेविकेला मारला डोळा 

Next
ठळक मुद्देनगसेविका पिंकी देवी यांनी महापौर सीता साहू यांच्या मुलांविरूद्ध छेडछाडीचा आरोप केला आहे.  महापौरांनी तुझी चुकी असल्याचे नगरसेविकेला उलटे सुनावले.

पटना - बिहारमधील पटना महानगर पालिकेच्या बैठकीत चक्क महापौरांच्या मुलाने नगरसेविकाला डोळ्या मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित नगसेविकेने महापौरांकडे तक्रार देखील केली. मात्र, महापौरांनी तुझी चुकी असल्याचे नगरसेविकेला उलटे सुनावले. त्यांनतर नगरसेविकेने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे.  नगसेविका पिंकी देवी यांनी महापौर सीता साहू यांच्या मुलांविरूद्ध छेडछाडीचा आरोप केला आहे.  

बिहारमधील पटना महानगर पालिकेत घडलेली धक्कादायक घटना आहे. नगसेविका पिंकी देवी यांनी महापौर सीता साहू यांच्या मुलांविरूद्ध छेडछाडीचा आरोप करत पिंकी देवी यांनी सांगितले की, महानगर पालिकेची बैठक होती. यावेळी महापौरांचा मुलगा शिशिरकुमार नगरसेवक नसतानाही हजर होता. बैठक सुरू असताना शिशिर माझ्याकडे बघून हसला आणि डोळा मारला. मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, त्याने वारंवार तशाप्रकारे आपलं वागणं कायम ठेवलं. त्यावर देवी यांनी तुझ्या पालकांकडे याबाबत तक्रार करेन असे धमकावून देखील घाबरला नाही. समज देऊनही न ऐकल्याने अखेर पिंकी देवी यांनी महापौर सीता साहू यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर त्यांनी देवी यांना दोष दिला. तुम्ही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता असे महापौर यांनी नगरसेविका पिंकी देवी यांनी सांगितले. याबाबत देवी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच हा प्रकार थांबला नाही तर आपण महिला आयोग किंवा न्यायालयात जाऊ, असा आक्रमक इशारा देवी यांनी दिला आहे. 

Web Title: Shocking! bihar ward councilor accuses mayors son of eve teasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.