धक्कादायक! भाडेकरुच्या बेडरुममध्ये कॅमेरा, पती-पत्नीच्या सेक्सचे व्हिडीओ आरोपी पॉर्न वेबसाईटवर करायचा अपलोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 02:58 PM2017-10-12T14:58:04+5:302017-10-12T17:41:15+5:30
घरमालकाच्या मुलाने भाडेकरुच्या बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पती-पत्नीमध्ये होणा-या सेक्सचे चित्रीकरण केल्याची एक धक्कादायक घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे.
बंगळुरु - घरमालकाच्या मुलाने भाडेकरुच्या बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पती-पत्नीमध्ये होणा-या सेक्सचे चित्रीकरण केल्याची एक धक्कादायक घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे. बंगळुरु पोलिसांची सायबर गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत आहे. आरोपी व्हिडीओ बनवून ते पॉर्न वेबसाईटवर अपलोड करत होता. खासगी कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
30 वर्षीय महिलेने आरोपीचे नाव अंजान असल्याचे सांगितले. तो घरमालकाचा मुलगा आहे. त्याने जोडप्याच्या बेडरुममध्ये सहज लक्षात येणार नाही अशा पद्धतीने छुपा कॅमेरा फिट केला होता. तो या कॅमे-याने पती-पत्नीमध्ये घडणा-या सेक्सचे चित्रीकरण करुन तेच व्हिडीओ पॉर्नसाईटवर अपलोड करत होता.
दोघे पती-पत्नी खासगी कंपनीत नोकरीला असून, त्यांनी केआर पूरममधल्या श्री रामा लेआऊटमध्ये एक घर भाडयाने घेतले होते. 29 सप्टेंबरला या जोडप्याला त्यांचे व्हिडीओ पॉर्नवेबसाईटवर असल्याची माहिती मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुमचे व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर पाहिले जात असल्याचे पतीला सांगितले.
फोन करणा-याने व्हिडीओची लिंकही दिली. व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघा पती-पत्नीला जबर धक्का बसला. आरोपी अंजान शनिवारीच घरातून पळून गेला असून, प्रथमदर्शनी तोच गुन्हेगार असल्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले. हे व्हिडीओ आता पॉर्न वेबसाईटवरुन डिलीट करण्यात आले आहेत.