धक्कादायक ! पोलिसाकडूनच महिलेवर बलात्कार, दोघांनी दिला घराबाहेर पहारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 10:07 AM2019-12-03T10:07:55+5:302019-12-03T10:08:37+5:30

मला एका खोलीत नेऊन दोघांनी माझ्यावर बलात्कार केला, त्यावेळी इतर दोघांनी घराला बाहेरुन कुलूप लावलं होतं

Shocking case ! Police rape on woman, guard both outside the house in odisha | धक्कादायक ! पोलिसाकडूनच महिलेवर बलात्कार, दोघांनी दिला घराबाहेर पहारा

धक्कादायक ! पोलिसाकडूनच महिलेवर बलात्कार, दोघांनी दिला घराबाहेर पहारा

Next

हैदराबादमधील पशुवैद्यक महिलेवरील बलात्काराने देश हादरला आहे. येथील बलात्कार आणि हत्याप्रकरणाची घटना ताजी असतानाच, ओडिशातही धक्कादायक बलात्कार उघडकीस आला आहे. ओडिशातील पुरी येथे एका पोलीस हवालदारासह दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी महिलेनेच पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

निमपाडा शहरात एका बस स्थानकावर ही महिला बसची वाट पाहत उभी होती. त्यावेळी, स्वत:ला पोलिस असल्याचं सांगत एका अनोळखी व्यक्तीने मदत करणार असल्याचं सांगितलं. आपल्या कारमधून महिलेला तिच्या पोहोचायच्या ठिकाणावर सोडण्याचं आश्वस्त केलं. पोलिसाचे ओळखपत्र दाखवल्यामुळे महिलेनंही त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन गाडीत प्रवेश केला. मात्र, महिला कारमध्ये बसल्यानंतर आणखी तीन अनोळखी इसमांनी गाडीत प्रवेश केला. त्यानंतर, मला काकटपूरऐवजी पुरी येथे नेऊन माझ्यावर बलात्कार करण्यात आला.

मला एका खोलीत नेऊन दोघांनी माझ्यावर बलात्कार केला, त्यावेळी इतर दोघांनी घराला बाहेरुन कुलूप लावलं होतं. झाडेश्वरी क्लबजवळी पोलिस क्वॉर्टरमध्ये माझ्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पीडित महिलने सांगितले. या पीडित महिलेने बलात्कारावेळी एका आरोपीचे पाकिट आपल्यासोबत घेतले. त्यावरुन पोलिसांनी आरोपीची खात्री पटवून शोध घेणं सोप झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाकिटवाल्या आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. विशेष म्हणजे ज्याला अटक करण्यात आली तो, पोलीस हवालदार असून त्यास निलंबित केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान, पीडित महिला आणि आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आलं आहे. 
 

Web Title: Shocking case ! Police rape on woman, guard both outside the house in odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.