धक्कादायक! केंद्राने पैसे दिले, पण खर्च नाही केले; महाराष्ट्रासह १४ राज्यांत उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:16 AM2023-06-27T10:16:30+5:302023-06-27T10:17:06+5:30

Money: महाराष्ट्रासह अनेक राज्य भांडवली खर्चाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारने पैसा पाठवूनही राज्यांनी ताे खर्च केलेला नाही. बॅंका ऑफ बडाेदाच्या एका अहवालातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Shocking! Center paid, but not spent; Depression in 14 states including Maharashtra | धक्कादायक! केंद्राने पैसे दिले, पण खर्च नाही केले; महाराष्ट्रासह १४ राज्यांत उदासीनता

धक्कादायक! केंद्राने पैसे दिले, पण खर्च नाही केले; महाराष्ट्रासह १४ राज्यांत उदासीनता

googlenewsNext

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह अनेक राज्य भांडवली खर्चाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारने पैसा पाठवूनही राज्यांनी ताे खर्च केलेला नाही. बॅंका ऑफ बडाेदाच्या एका अहवालातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७.४९ लाख काेटी रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र, केवळ ५.७१ लाख काेटी रुपयेच खर्च झाले. या राज्यांनी ७६.२ टक्केच निधी खर्च केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, १४ राज्यांनी ७५ टक्क्यांपेक्षाही कमी निधी खर्च केलेला आहे.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला २.१९ लाख काेटी रुपये देण्यात आले हाेते. २५ राज्यांना दिलेल्या निधीपैकी २९.२ टक्के रक्कम या दाेन राज्यांना दिली हाेती.  नागालॅंड, हरयाणा ५०%पेक्षा कमी मध्य प्रदेश     ९८% , झारखंड     ९८%, महाराष्ट्र     ७२.४%, युपी      ६९% केरळ     ६९.४%, आंध्र प्रदेश     २३%. 

केंद्राला १००% गुण
केंद्र सरकारने भांडवली खर्च तसेच राज्यांना केलेल्या कर्जवाटपाचे लक्ष्य पूर्ण केले, असे अहवालात म्हटले आहे. ११ राज्यांनी ८०%पेक्षा जास्त खर्च केला आहे.

४ राज्यांचे लक्ष्य पूर्ण 
कर्नाटक, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांनीच १०० टक्के निधी खर्च केला आहे.

Web Title: Shocking! Center paid, but not spent; Depression in 14 states including Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.