धक्कादायक...शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केंद्र सरकारला माहीतच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 08:15 PM2018-12-20T20:15:01+5:302018-12-20T20:15:45+5:30

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत ही माहिती दिली.

shocking... The Central Government does not know the number of farmers suicides! | धक्कादायक...शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केंद्र सरकारला माहीतच नाही!

धक्कादायक...शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केंद्र सरकारला माहीतच नाही!

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना हमीभाव, अच्छेदिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती किती जागरूक आहे याचा धक्कादायक खुलासा खुद्द कृषीमंत्र्यांनीच आज केला. महाराष्ट्रासह इतर राज्यांत हजारावर शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन वर्षांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची कल्पना नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत सांगितले आहे.


आत्महत्यांबाबत केंद्र सरकारला नॅशनल क्राइम ब्यूरो (एनसीआरबी) ही संस्था माहिती पुरविते. हीच संस्था आत्महत्यांची माहिती गोळा करते. 2016 नंतर या संस्थेने कोणतीही माहिती जाहीर केलेली नसल्याचा खुलासा सिंह यांनी केला. 


तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्रिवेदी यांनी 2016 पासून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सरकारने त्यांच्या कुटुंबियांना काय मदत केली, असा प्रश्न विचारला होता. 


राधामोहन सिंह यांनी लिहून दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, गृह मंत्रालयांतर्गत एनसीआरबी आत्महत्यांची माहिती एकत्र करून जाहीर करते. मात्र, त्यांच्या वेबसाईटवरच 2015 पर्यंतचे आकडे आहेत. त्यांनी 2016 नंतरचे आकडेवारी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. 
एनसीआरबीनुसार 2015 मध्ये 8 हजार शेतकऱ्यांनी तर 4500 हजार शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक लागत असून 3000 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाना 1358 आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे.

Web Title: shocking... The Central Government does not know the number of farmers suicides!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.